ई-कॉमर्स वेबसाइटवरुन खरेदी करताना ऑर्डर केलेल्या सामानाऐवजी वेगळीच वस्तू मिळाल्याच्या, चुकीच्या पत्त्यावर सामान डिलिव्हर झाल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयला अनोख्या पद्धतीने पत्ता समजवणाऱ्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर आता फ्लिपकार्टनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Mangesh Panditrao नावाच्या एका ट्विटर युजरने फ्लिपकार्ट डिलिव्हरी पॅकेजचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये डिलिव्हरी पॅकेजवर ‘Shipping/Customer address’ सेक्शनमध्ये जे लिहिलंय त्यामुळे हा फोटो चर्चेचा विषय ठरतोय. राजस्थानच्या कोटा शहरात डिलिव्हरी होणाऱ्या या पॅकेजवर घराच्या पत्त्याच्या जागी ‘448 चौथ माता मंदिर, मंदिर के सामने आते ही फोन लगा लेना आ जाउंगा’, असं लिहिलेलं आहे.


हा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावर फ्लिपकार्टनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘घर एक मंदिर है’ या वाक्याला आपण एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातोय, असं ट्विट फ्लिपकार्टने तो व्हायरल फोटो शेअर करताना केलं आहे.


हा फोटो व्हायरल होत असून नेटकरीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.