20 November 2019

News Flash

तो ‘अॅपल’ कंपनीबद्दल बोलत होता अन् तिला सफरचंद वाटले; पाहा नंतर काय झालं

सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाकिस्तानी अँकरने टिव्हीवरील चर्चेदरम्यान दिग्गज कंपनी अॅपलला फळांमधील सफरचंद समझल्याची विनोदी बाब समोर आली आहे. टिव्हीवर सुरू असलेल्या पॅनल डिस्कशनदरम्यान पॅनलिस्टनी अॅपल कंपनीचे नाव घेतले आणि टिव्ही शोच्या अँकरने त्याला फळांमधील सफरचंद समजले. यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पाकिस्तानच्या पत्रकार नायला इनायत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अँकर आणि पॅनलिस्टमधील चर्चा या व्हिडीओमध्ये सुरू आहे. याचदरम्यान, संपूर्ण पाकिस्तानच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या तुलनेत अॅपल कंपनीचा व्यवसाय अधिक असल्याचे एका पॅनलिस्टने पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा करताना म्हटले. यावर त्या अँकरने पॅनलिस्ट हे खाण्याच्या अॅप्पलबद्दल म्हणजेच सफरचंदाबद्दल बोलत असल्याचे अँकरला वाटले. त्यावर बोलताना अँकरनेही सफरचंदाच्या अनेक प्रकारांबाबत आपल्याला माहित असल्याचे म्हटले.

First Published on July 8, 2019 4:24 pm

Web Title: pakistani anchor confuses apple company with apple fruit during discussion on tv jud 87
Just Now!
X