आपल्या पक्षामुळे किंवा पक्षानं राबवलेल्या विविध योजनांमुळे सामान्य जनतेला किती फायदा झाला हे दाखवण्याची एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाही. विद्यमान सरकार तर योजनांपेक्षा जाहीरातबाजीवरच डोंगराएवढा खर्च करत आहे असे आरोपही आपण अनेकदा ऐकत असतो. थोडक्यात काय तर योजनांचा लाभ जनतेला मिळो अगर न मिळो पण जाहीरातबाजी करण्यात मात्र कोणताच पक्ष मागे हटत नाही. देशाच्या कोणत्याही गल्लीबोळ्यात गेलं तरी राजयकीय पक्षांच्या जाहिरातबाजींचे भलेमोठे पोस्टर आपल्याला दिसतील.

पण कधी कधी जाहीरातबाजी करताना घोळही होऊ शकतो. असाच काहीसा घोळ आम आदमी पक्ष आणि भाजपनं लावलेल्या बॅनवर दिसून आला. श्रीमंतांनी गॅस सबसीडी सोडवी यासाठी आवाहन करणारी जाहिरात भाजपनं केली होती, तर दुसरीकडे दिल्ली सरकारनं तीन वर्षांत सरकारनं केलेल्या बदलाचा आढावा जाहिरातीत मांडला होता. दोन्ही पक्ष आपापल्या परीनं जाहिरातबाजी केली होती. पण एक मोठी चुक यात झाली आणि या दोन्ही पक्षांचे बॅनर सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले. त्याचं झालं असं की जाहिरातीत दोन्ही पक्षांनी दाखवलेले ‘लाभार्थी’ अगदी सेम टु सेमच होते. फरक इतकाच होता की फलकावर पक्षांची नावं मात्र वेगवेगळी होती.

आता ज्यांनी ही जाहिरात डिझाइन केली त्याच्या किंवा अगदी पक्षाच्याही ही बाब लक्षात आली नाही.पण, ‘लाभार्थी जनता’ बरीच स्मार्ट असल्यानं त्यांच्या नजरेतून काही हा घोळ सुटला नाही त्यामुळे सोशल मीडियावर आप आणि भाजपची ही सेम टु सेम जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे.