अडल्ट वेबसाईट पॉर्न हबनं आपल्या वेबसाईटवरी अपलोड आणि डाऊनलोडबाबत असलेल्या कंटेंटच्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाईम्समध्ये या वेबसाईटवर कमी वयाच्या मुलींबाबतचा कंटेट असल्याचं एक वृत्त प्रकाशित झालं होतं. त्यानंतर पॉर्न हबनं आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

“कोणत्याही अनोळखी युझरला आता यावर व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. तसंच पॉर्न हब आपल्या वेबसाईटवर पार्टनर्स आणि सदस्यांना कंटेट अपलोड करण्यावर निर्बंध घालणार आहे,” असं पॉर्न हबनं स्पष्ट केलं. एकदा कंटेंट अपलोड झाल्यानंतर, पोर्नहब कंटेंट डाउनलोड करणं पूर्णपणे थांबवणार आहे. हे यापुढे वापरकर्त्यांना साईटवरील पैसे भरल्यानंतरही कोणताही कंटेट डाऊनलोड करता येणार नाही. निकोलस ख्रिस्तोफ यांच्या न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तानंतर पॉर्न हबनं हे पाऊल उचललं आहे. यानंतर पॉर्न हब आणि त्यातील कंटेटबद्दल तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
Recovery of 605 crores for house rent action of Zopu authority is shock to developers
घरभाड्यापोटी ६०५ कोटींची वसुली, ‘झोपु’ प्राधिकरणाच्या कारवाईचा विकासकांना धसका

“पॉर्न हबनं आपल्या धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. आता केवळ व्हेरिफाईड युझर्सनाच यावर कंटेट अपलोड करण्याची परवानगी असणार आहे. तर आता कोणालाही कंटेंट डाऊनलोड करता येणार नाही. पॉर्न हबनं २०२१ मध्ये आपला पहिला अहवाल प्रकाशित करणार आहे. दरम्यान, पॉर्न हब आता किती जबाबदारीनं या गोष्टीवर विचार करेल यावर मोठी डील अवलंबून आहे. मला यावर भरवसा नाही. तसंच ही डील तो कंटेंट पॉर्न हबनं हटवला आहे की नाही यावरही अवलंबून असेल,” असं ख्रिस्तोफर यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.