चीनमधल्या क्विंग साम्राज्यातील एका दुर्मिळ वस्तूवर जवळपास १९७ कोटींची बोली लावण्यात आली आहे. लिलावाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या अवधीतच या दुर्मिळ वाटीची विक्री झाली आहे. अठराव्या शतकात सम्राटासाठी चिनी मातीपासून या वस्तू तयार करण्यात आल्या होत्या. या भांड्यावर कोट्यवधीची बोली लावण्याचं कारण म्हणजे अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या केवळ तीनचं वाट्या फक्त अस्तित्वात आहेत.

VIRAL : नावातच बरंच काही आहे! ‘या’ गावांतील लोकांना पाहता येणार फ्री पॉर्न

पारंपारिक चिनी पद्धतीचं नक्षीकाम न करता यावर काहीसं पाश्चिमात्य पद्धतीचं नक्षीकाम करण्यात करण्यात आलं आहे. ६ इंच व्यासाच्या निळसर गुलाबी भांड्यावर डेफोडेलीच्या फुलांचं नक्षीकाम आहे. असं म्हणतात की मुळ कारागिरांनी युरोपीयन कारागिरांकडून हे भांड घडवण्याचं तंत्र आत्मसात केलं होतं. त्यामुळे युरोपीय आणि चिनी नक्षीकामाचा अनोखा मिलाप येथे पाहायला मिळतो.  या भांड्यावर चिनमधल्याच एका व्यावसायिकानं ३०.४ मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास १९७ कोटी ६२ लाखांची बोली लावली. विशेष म्हणजे लिलावाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच त्याची विक्री झाली.

Video : हॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टारने केला रोबोट सोफियाला किस करण्याचा प्रयत्न !