19 November 2019

News Flash

विराटला शुभेच्छा देताना पंत म्हणाला, ओ काका ! नेटकरी म्हणतात मस्का मारतोयस का?

विराटचं वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतच वयाच्या ३१ व्या वर्षात पदार्पण केलं. आपली पत्नी अनुष्कासह भूतानमध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत असलेल्या विराटवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. ऋषभचा दिल्लीकर सहकारी आणि भारतीय संघाचा सध्याचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

ऋषभने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, Happy birthday chachaaa, always keep smiling अशी कॅप्शन देत विराटला शुभेच्छा दिल्या.

त्याच्या या शुभेच्छांवर नेटकऱ्यांनी पंतलाच, संघात राहण्यासाठी मस्का मारतोयस का असं विचारत ट्रोल केलं आहे.

पंत मागील काही सामन्यांपासून त्याच्या खराब खेळीमुळे टीकेचा धनी बनला आहे. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल केले जात आहे. बांगलादेशविरुद्ध पंतने खास प्रभावी कामगिरी केली नाही. संघाची स्थिती खराब असताना पंत फलंदाजीसाठी आला, पण तो वेगाने धावा करू शकला नाही. शिवाय, यष्टीरक्षणातही पंत प्रभाव पडण्यात अपयशी ठरला.

First Published on November 6, 2019 2:30 pm

Web Title: rishabh pant troll over his birthday wishes to virat kohli psd 91
Just Now!
X