करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही लोक करोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Photo : शोएब मलिकने केली आहेत २ लग्न; एक पत्नी सानिया, तर दुसरी…

करोनाविरोधात लढण्यासाठी साऱ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असणाऱ्यांवर आणि गरीब व गरजुंवर उपासमारीची वेळ आली आहे. विविध सेवाभावी संस्था आणि सेलिब्रिटी अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत खाण्यापिण्याच्या पाककृती सोशल मीडियावर शेअर करण्याऱ्यांवर स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली.

World Cup Final : युवराजचा रवी शास्त्रींना खोचक टोला, म्हणाला…

“अजूनही तुम्हां लोकांचं खाण्याच्या रेसिपीचे व्हिडीओ आणि अन्नाच्या थाळीचे फोटो पोस्ट करून मन भरलं नाही का? जगभरात आणि विशेषकरून आशियाई उपखंडात अनेक लोक असे आहेत, ज्यांना नशिबाची साथ असेल तर एकवेळचे जेवायला मिळते. कितीतरी लोक हे सध्या उपासमारीने मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत असे व्हिडीओ पोस्ट करणे कितपत योग्य आहे?”, असे सडेतोड मत सानियाने व्यक्त केले.

दरम्यान, हातावर पोट असणाऱ्यांवर सध्या करोनाच्या तडाख्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पुढाकार घेतला आहे. सानियाने रोजंदारी कामगारांना जेवण आणि मुलभूत गरजेच्या वस्तू पुरवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी तिने एक चळवळ उभी केली आहे. ”संपूर्ण जग सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आपण घरी सुरक्षित आहोत हे आपलं नशीब आहे. पण अनेकांचे यामुळे नुकसान होत आहे. हातावर पोट असणाऱ्यांना अतिशय कठीण दिवस आहेत. त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपापल्या परीनं त्यांना मदत करण्याची हीच वेळ आहे,” असे सानियाने म्हटले आहे.