पुरातत्वशास्त्रज्ञांना लिस्बननजीकच्या किनाऱ्यावर जवळपास ४०० वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचा शोध लागला आहे. भारतातून मसाले वाहून नेणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. या जहाजाचा सांगाड आणि त्यावरील काही सामान अजूनही चांगल्यास्थितीत आहे अशी माहिती पुरातत्वशास्त्रज्ञांनी दिली आहे.

पोर्तुगाल या लहान देशाची राजधानी लिस्बन आहे. वास्को दि गामाने हिंदुस्तानाकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधून काढल्यावर पंधराव्या- सोळाव्या शतकात मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापाराच्या जोरावर लिस्बनची भरभराट होऊन तेथे एक समर्थ साम्राज्य उभे राहिले. सोने, रेशीम, मसाले यांच्या व्यापाराने लिस्बन सोने, रेशीम, मसाले यांच्या व्यापाराने संपन्न झालेल्या लिस्बन संपन्न होऊ लागला. या शहरात मसाल्याचा व्यापर जोरदार चालायचा. त्यामुळे हे जहाज १५७५ ते १६२५ च्या काळात बुडालं असल्याचं म्हटलं जात आहे. जहाजावर काही मसाले, तोफा, विशिष्ट प्रकारच्या मोहराही सापडल्या आहेत.