26 September 2020

News Flash

विद्यार्थिनीला मदत करणाऱ्या श्वानाला मानद पदवी

शिक्षणाचा आणि श्वानाचा संबंध नसतोच.

शिक्षणाचा आणि श्वानचा संबंध नसतोच. म्हणजे श्वानाचा संबंध असलाच तर तो प्रशिक्षणाशी असतो. पोलिस दलात काम करणाऱ्या श्वानांना विशिष्ट हुद्दा असतो, मासिक वेतन असते, पण त्याचे शैक्षणिक कार्य किंवा कागदपत्रे पाहून त्याची नियुक्ती होत नाही. त्यामुळे पदव्यांसाठी माणूस श्वानासारखा लंगलंग फिरत असला तरी श्वान मात्र त्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे एकाद्या श्वानाच्या नावापुढे (हो, श्वानालाही नावे असतात. विशेषतः घरी पाळण्यात येणाऱ्या श्वानांना काहीतरी टॉमी-बिमी किंवा मग मोती-बिती अशी नावे असतात) तुम्ही कधी एखादं पद लिहिलेलं पाहिलं काय? निश्चित नाही. पण एका अमेरिकन श्वानाला मात्र हे भाग्य मिळाले आहे. अमेरिकेतील एका विद्यापीठाने या श्वानाला पदविका दिली आहे. ग्रिफिन नावाच्या गोल्डन रिट्रीव्हर जातीच्या सर्विस डॉगला मानद पदविका देण्याचा निर्णय पोस्टडॅम न्यूयॉर्क स्कूल बोर्ड ट्रस्टीनी घेतला आणि शनिवारी त्याला पदवी प्रदान करण्यात आली. ग्रिफिन असे त्या प्रशिक्षित श्वानाचे नाव आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षित श्वान सहाय्यक म्हणून दिली जातात. त्यांना सर्व्हिस डॉग म्हणतात. ब्रिटनी हाउले ही तरुणी ऑक्यूपेशनल थेरपीचे शिक्षण घेत असताना ग्रिफिन सतत तिच्यासोबत होता. तिचा मोबाईल शोधून देणे, दरवाजा उघडणे, लाईट लावणे, एखादी वस्तू आणून देणे यासारखी कामे तो करायचाच. त्याचप्रमाणे ब्रिटनीला व्हीलचेअरशिवाय हालचाल करू शकत नाही. ती जेव्हा अशक्त, अपंग लोकांवर उपचार करायची तेव्हाही तो तिला मदत करत असे. इतकेच नव्हे तर ब्रिटनीला वेदना असह्य होत तेव्हा तो तिच्या सतत सोबत असायचा. ब्रिटनी सांगते, ‘मी जे जे केले ते सर्व ग्रिफिननेही केले. माझ्या पदवी मिळविण्यात त्याचे योगदान मोठे आहे.’

नॉर्थ कॅरोलिना फोर्ट ब्रागमध्ये इंटर्नशिपच्या काळात दोघांनीही चालण्या बोलण्यात अडचण असणारे सैनिक आणि अन्य दिव्यांग यांची सेवा केली. त्यामुळे ग्रिफिनचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याचे पोस्टडॅम न्यूयॉर्क स्कूल बोर्डाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 12:36 pm

Web Title: students dedicated service dog awarded honorary diploma
Next Stories
1 आश्चर्यम..! निर्सगाच्या सानिध्यात जमिनीखाली दडलेले अनोखे गाव
2 Video : दोन हत्तींमध्ये जुंपते तेव्हा…
3 Ambani wedding: ‘जिंदगी बन जायेगी’, ‘त्या’ फोटोग्राफरला एवढाच मिळाला होता संदेश
Just Now!
X