News Flash

Video : लाडक्या शिक्षकाची बदली होताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा पूर

शाळेत असताना प्रत्येकजण आपल्या शिक्षकांची टिंगल-टवाळी करत असतो.

शाळेत असताना प्रत्येकजण आपल्या शिक्षकांची टिंगल-टवाळी करत असतो. तसंच कुठल्यातरी शिक्षकाबद्दल आपल्या मनात आदर, हळवा कोपराही असतो. याच ओढीने निरोप समारंभाच्या वेळी डोळ्यांच्या कडा ओलावतात. मध्यप्रदेशातील कटनी शाळेतील लाडक्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रडून हैदोस घातला. ऐवढेच नव्हे तर शिक्षकालाही डोळ्यातील आश्रू थांबवता आले नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरू -शिष्याच्या प्रेमाला नेटकरी सलाम ठोकत आहेत.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या लाडक्या शिक्षकाचे नाव मंगलादीन असे आहे. नुकतीच मध्यप्रदेशमधील तीस हजार शिक्षकांची बदली झाली होती. त्यामध्ये मंगलादीन यांचाही समावेश होता. शाळेत त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रिय विद्यार्थांचा निरोप घेताना लाडक्या शिक्षकाच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

मंगलादीन मास्तरांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. निरोपावेळी मंगलादीन यांना धरून विद्यार्थी धाय मोकलून रडायला लागले. कोणी त्यांना मिठ्या मारल्या, कोणी हाताला धरुन थांबवलं, तर कोणी त्यांच्याभोवती कडं घालून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून मंगलादीन यांनाही अश्रू अनावर झाले. एकीकडे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहत असताना, मंगलादीन यांच्या डोळ्यांना पूर आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 10:48 am

Web Title: teacher got transferred and students were crying on his farewell video goes nck 90
Next Stories
1 बाप रे : 280 किमी प्रति तास, सायकलिंगच्या वेगाचा नवा विक्रम
2 Photos : अनुष्काच्या बिकिनीतल्या ‘हॉट’ फोटोवर ‘कूल’ मीम्स व्हायरल
3 VIDEO: एस्केलेटरवरील मस्ती पडली महागात, पाहा नक्की काय झाले
Just Now!
X