News Flash

फोटोसाठी काहीपण! पोटावर मधमाश्या ठेवत केलं मॅटर्निटी फोटोशूट

'दहा हजारांच्या आसपास या मधमाश्या असतील'

मॅटर्निटी किंवा प्रेग्नंसी फोटोशूटचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला. वेगवेगळे इफेक्ट्स, वेगवेगळे पोझ, हटके जागा शोधून हा फोटोशूट इतरांपेक्षा वेगळा कसा करता येईल असा विचार अनेकजण करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मॅटर्निटी फोटोशूट चर्चेचा विषय ठरतोय. टेक्सासमधल्या बोर्नी इथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेनं चक्क हजारो मधमाश्यांसोबत फोटोशूट केलं आहे. या फोटोतील तिच्या पोटावर असलेल्या मधमाश्या पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

पांढऱ्या रंगाच्या ब्रालेट आणि ट्राऊजरमध्ये या गरोदर महिलेनं पतीसोबत मिळून आऊटडोअर फोटोशूट केलं आहे. फोटोतील ही महिला मधमाश्यांचं पालन करणारी आहे. फोटोशूटसाठी मधमाशांचं पोळं असलेल्या बॉक्सजवळ ती उभी आहे. तर अनेक मधमाश्या तिच्या अवतीभवती फिरत आहेत. “हे माझ्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो आहेत. माझ्या शरीरावर फक्त मधमाश्या सोडण्यात आल्या होत्या. एकाही मधमाशीने माझ्यावर हल्ला केला नाही. दहा हजारांच्या आसपास या मधमाश्या असतील”, अशी तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्या महिलेने फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झाले. तिच्या या फोटोवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. गर्भाशयातील बाळाचे प्राण धोक्यात घातल्याची टीकाही काहींनी केली. तर डॉक्टरांनी असं करण्यास परवानगी कशी दिली, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.

नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रियांनंतर महिलेनं फोटोशूटसोबतच एक सूचना पोस्ट केली. ‘हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. कोणत्याही अनुभवाशिवाय किंवा माहितीशिवाय असे फोटोशूट करण्याचा प्रयत्न करू नका’, अशी सूचना तिने लिहिली. तरीसुद्धा महिलेला मधमाश्यांच्या थीमनुसार फोटोशूट करायचं सुचलंस कसं, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:13 pm

Web Title: texas woman maternity photoshoot with a swarm of bees on her belly baffles many online ssv 92
Next Stories
1 ‘मोगली किधर है बगीरा?’; दुर्मिळ ब्लॅक पँथरच्या दर्शनानंतर नेटकऱ्यांना आठवलं जंगल बूक
2 बापरे… ‘उडणारा’ साप!; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न, ‘२०२० आणखीन काय काय दाखवणार?’
3 PUBG चा नाद लागला नातवाला, पण दोन लाखांचा फटका बसला आजोबांना
Just Now!
X