टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या एका महिनेने एकाच वेळी सहा मुलांना जन्म दिल्याचे समजत आहे. या आधीही ह्यूस्टनमध्ये एका गरोदर महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिल्याची घटना घडली होती.

१५ मार्च रोजी अमेरिकेतील ‘द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास’मध्ये एका गर्भवती महिलेने सहा बाळांना जन्म दिला आहे. ‘थेलमा चैका’ असे या महिलेचे नाव आहे. तिने जन्म दिलेल्या बाळांमध्ये चार मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे. तसेच डॉक्टरांच्या मते महिला आणि तिच्या सहा मुलांची प्रकृती उत्तम असून सातही जणं सुखरूप आहेत.

जगभरात ४.७ अब्ज गर्भवती महिला एकाच वेळी बाळांना जन्म देतात. परंतू त्यात एखादीच महिला अशी असते जी सहा मुलांना एकाच वेळी जन्म देऊ शकते अशी माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली आहे. आपल्या दोन मुलांची नावे ‘जीना’ आणि ‘जुरियल’ अशी थेलमा यांनी ठेवली असून इतर चार मुलांच्या नावांचा विचार त्या करत आहेत.