तहानेने व्याकूळ झालेल्या एका खारुताईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भररस्त्यात एका व्यक्तीला इशारा करुन ही खार त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीची मागणी करत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध पायावर उभं राहून ही खारुताई एका व्यक्तीकडे थेट इशारे करुन पाण्याची मागणी करताना दिसतेय. एकदा नाही तर वारंवार ही खारुताई त्या व्यक्तीकडे पाणी मागते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘रेड्डिट’वर हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर तो ट्विटर आणि अन्य माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुण-तरुणीजवळ एक खार दिसत आहे. त्या खारीचं लक्ष तरुणाच्या हातात असलेल्या पाण्याच्या बाटलीकडे असून ती पायावर उभं राहून त्याच्याकडे चक्क इशाऱ्यांनी पाण्याची मागणी करते. एकदा नाही तर सतत पाण्याच्या बाटलीकडे इशारे करत असल्याने तो व्यक्ती अखेर थोडा खाली वाकतो आणि पाण्याची बाटली खारीच्या तोंडाला लावतो. तहानेने व्याकूळ असल्याने ती खार बाटलीने माणसाप्रमाणे लगेच गटागटा पाणी पिते आणि बाटलीतलं सगळं पाणी संपवते. पाणी पिऊन मन तृप्त झाल्यानंतर ही खार आल्या पावली परत जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ :-

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर तहानेने व्याकूळ झालेल्या या खारुताईचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत असून त्यावर युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.