अमेरिकेमध्ये पाय गमावलेल्या एका कासवासाठी चक्क व्हीलचेअर बनवण्यात आली आहे. १५ वर्षीय या कासवाचे नाव पेड्रो असे आहे. काही कारणामुळे कासवाचे मागील दोन्ही पाय गमावले होते. त्याला कोणतीही हलचाल करता येत नव्हती. कासवाच्या मालकाने त्याला एलएसयू स्कूल ऑप वेटरनिटी मेडिसीनच्या वेटरनिटी टिचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता दोन्ही पाय सोडता त्याच्यामध्ये काहीच दोष नसल्याचे समोर आले.

येथील डॉक्टर आणि विद्यार्थांनी पेड्रोसाठी स्पेशल व्हीलचेअर तयार केली. त्यानंतर तो चालूच नाही तर धावू लागला. सोशल मीडियवर पेड्रोचा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी डॉकर आणि मालकांवर कौतुकांचा वर्षाव करत आहेत. केली रॉकवेल, डॉ. मार्क मिशेल, एलएसयू वेटरनिटीची विद्यार्थिनी एस. सी. मर्सर आणि इतर विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी कासवासाठी व्हीलचेअर तयार केली.

पेड्रोला त्याचे मागचे दोन्ही पाय मिळाले. या चाकांमुळे फक्त तो चालूच नाही तर धावू लागला. इतर कासवांच्या तुलनेत त्याची चालण्याची गती वाढली आणि हे पाहून सर्वांनाच आनंद झाला.

‘आम्ही एका सळईला दोन्ही बाजूंनी चाकं लावली. पेड्रोच्या शरीराला पुरेल आणि शरीरावर बसेल असा त्याचा आकार ठेवण्यात आला. याला पेड्रोच्या शरीरावर बसवण्यासाठी घोड्याची नाळ बसवण्यासाठी जे एपोक्सी लावलं जातं त्याचा वापर केला आणि इतर काही गोष्टीदेखील वापरल्या, असे केली रॉकवेल म्हणाल्या.