18 October 2019

News Flash

Photo : ..म्हणून शाहरुख-झिवाचा तो फोटो होतोय व्हायरल

शाहरुखसोबत हसतखेळत पोझ देणारा झिवाचा हा फोटो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

शाहरुख खान, झिवा

आयपीएल २०१९च्या गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्ज पहिल्या स्थानावर आहे. तर शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानी आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोलकाता संघाला धुळ चारल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या संघाने कालच्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थानवर निसटता विजय मिळवून गुणतालिकेतील आपले पहिले स्थान कायम राखले आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो आहे धोनीची मुलगी झिवा आणि किंग खान अर्थात शाहरुखचा.

स्टेडियमवरील शाहरुख-झिवाचा हा फोटो जुनाच आहे. पण ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ने ‘कोलकाता नाईट रायडर्स’ला मागे टाकल्यानंतर हा फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहरुखसोबत हसतखेळत पोझ देणारा झिवाचा हा फोटो नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

View this post on Instagram

#shahrukhkhan with #zivadhoni 😝❤️❤️❤️

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

महेंद्र सिंह धोनीची चिमुकली झिवा नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मल्याळममध्ये भक्तीगीत गाणारी झिवा, आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी झिवा, पोळ्या लाटणारी झिवा… असे तिचे नाना तऱ्हेचे अंदाज नेहमीच सगळ्यांना भावतात. झिवाची वाढती फॅन फॉलोअिंग लक्षात घेता तिच्यासाठी वेगळं इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची संख्या सध्या 6 लाख 98 हजारांहून अधिक आहे.

First Published on April 12, 2019 12:57 pm

Web Title: this is why shah rukh khans picture with ms dhoni daughter ziva dhoni going viral