“येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे,” असं म्हणत विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली. मात्र अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचं आमंत्रण नेटकऱ्यांनी फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणं येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या गुरुवारी अमृता यांचं गाणं येणार असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे.

अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असं सांगितलं. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

नक्की वाचा >> तुम्ही देवेंद्र फडणवीसांना राजकीय सल्ले देता का?; अमृता फडणवीस म्हणतात, “एका दुसऱ्या प्रोफेशनमध्ये…”

चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.  या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आलाय. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असं या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असंही लिहिण्यात आलं आहे.


ट्रोलिंगबद्दल काय म्हणाल्या आमृता?

सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता यांना ट्रोलिंगसंदर्भात मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अमृता यांनी, “ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अ‍ॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> …म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही; अमृता यांनी सांगितली ‘मन की बात’

ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?

ट्रोलिंग आणि टीका वाचून निराश व्हायला होतं का?, असा पुढचा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना अमृता यांनी, “मी कानसेन पण आहे आणि थोडी तानसेन पण आहे. मी चांगल्या लेव्हलपर्यंत गाणं शिकलेलं आहे लहानपणापासून. त्यामुळे मला माझे प्लस पॉइण्ट काय आहेत आणि मायनस पॉइण्ट काय आहेत हे ठाऊक आहे. जे ट्रोलिंग होत आहे ते राजकीय दृष्ट्या केलं जात आहे की सामान्यांकडून केलं जात आहे हे मला ठाऊक आहे,” असं उत्तर दिलं.

यात काहीही गैर नव्हतं

“जेव्हा स्वत:वर एक विश्वास असतो तेव्हा आपल्याला ठाऊक असतं की आपण किती लायक आहोत. माझं अत्ताचं गाणं होतं ते सामाजिक गाणं होतं. स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात होतं. त्यावर काय प्रकारचं ट्रोलिंग झालं ते पाहिलं आपण. मला वाटतं की हे खरे लोकांचे, सामान्य लोकांचे विचार नाहीयत. मला वाटतं की मला तेवढी बुद्धी आहे. माझ्या आसपासच्यांना तेवढी बुद्धी आहे की ते मला डायरेक्ट करु शकतात तू बरोबर करते आहे की नाही. त्यांनीही मला म्हटलं की यात काहीही गैर नव्हतं आणि मी आतापर्यंत जे केलं त्यातही काहीही चुकीचं नव्हतं,” असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

नक्की वाचा >> अमृता फडणवीस म्हणतात, मी योग्य मुद्दा सापडल्यावरच बोलते आणि शिवसेनावाले…

गाणी कशापद्धतीने निवडता

गाणी गाण्यासंदर्भातील निर्णय घेताना आपण काही सामाजिक तर कधी कोणाला तरी पाठिंबा दर्शवण्यासाठी मोफत गाणी गातो, असंही अमृता म्हणाल्या. “काही सामाजिक गाणी असतात तर कधी कधी काही निर्माते म्हणतात की आमच्यासाठी करु द्या. आम्ही त्याला मार्केटींग करतो वगैरे तेव्हा मी करते काही गाणी. त्यात मला काही गैर वाटत नाही. मी कोणाकडूनही पैसा घेत नाही. मी स्वत:च्या इच्छेसाठी गाणी गाते. माझ्यात टॅलेंड आहे म्हणून गाते. गाणं हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे ते माझं जीवन नाहीय. त्यामुळे तुम्ही जितकं ट्रोलिंग करायचं आहे तितकं करा,” असं अमृता यांनी म्हटलं आहे.