टेबल टेनिसपटू मनिका बत्रानेही टोकियोला जाण्यापूर्वी तिच्या खास नेल आर्ट परिधान केल्याचा फोटो शेअर केला आहे. काही काळापूर्वी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने तिच्या स्पोर्टिंग ऑलिम्पिक-स्पेशल नेल आर्टचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने नखावर पांढऱ्या नेल पॉलिशवर ऑलिम्पिक रिंग्ज बनवल्या होत्या. पीव्ही सिंधू यांच्या पोस्टनंतर टेबल टेनिसपटू मनिका बत्रानेही टोकियोला जाण्यापूर्वी तिचा खास नेल आर्ट परिधान केलेला फोटो  शेअर केला आहे. बत्राने तिच्या थंबनेलवर ऑलिम्पिक रिंग्ज बनवल्या आहेत तर मध्यम आणि अंगठ्याला निळ्यामध्ये ‘भारत’ हा शब्द लिहला आहे. इतर दोन बोटांवर राष्ट्रध्वज रंगविला आहे.

ऑलिम्पिक मॅनीक्युअर

ऑलिम्पिक मॅनीक्युअर आता बर्‍याच वर्षांपासून प्रचलित आहे. टाईमच्या लेखानुसार २०१२ मध्ये लंडनमधील खेळांच्या वेळी असे मॅनीक्युअर मुख्य प्रवाहात आले होते. तेव्हा जलतरणपटू मिस्सी फ्रँकलिन आणि रेबेका अ‍ॅडलिंग्टन यांनी देशभक्तीपर नेल आर्ट परिधान केलेले. नंतर या गोष्टीचा ट्रेण्डच आला जो आजही सुरु आहे. २०१२च्या आधी अगदी १९ च्या काळातही हा ट्रेण्ड बघितला गेला होता. १९८० च्या उत्तरार्धात ट्रॅक आणि फील्ड अॅथलीटने तीन-इंच रंगीबेरंगी टाचा रंगवल्या होत्या. या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर सगळ्यात पहिला प्रयोग फ्लॉरेन्स ग्रिफिथ-जोनर यांनी केला होता असं म्हंटल जात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sindhu Pv (@pvsindhu1)

नेटीझन्सच्या शुभेच्छा

मनिका बत्राने मिशन #टोकियो२०२० #ऑलिंपिक गेम्स या कॅपशनसह नेट आर्टचा फोटो पोस्ट केला. तिच्या या पोस्ट खाली नेटीझन्सने प्रतिक्रिया मांडत सपोर्ट दाखवला आहे. तुम्ही नक्कीच जिंकून येणार असा विश्वासही दाखवला आहे. नेट आर्टवरून मनिका बत्राच असेल अशी एका युजरने कमेंट केली आहे. तर अनेकांनी जिफच्या माध्यमातून ऑल द बेस्ट असा मेसेज दिला आहे.