आंध्र प्रदेशमधील दोघांनी केलेल्या एका पराक्रमाबद्दल त्यांची गिनीज बुकात नोंद झाली आहे. डोळ्यावर पट्टीबांधून एकाने खाली झोपलेल्या व्यक्तीच्या सभोवतलची सर्व नारळं मोठ्या हातोडीने फोडली आहेत. त्यांनी केलेल्या या विक्रमाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथील निवासी असलेल्या प्रभाकर रेड्डी पी यांनी, जमिनीवर झोपलेल्या त्यांच्या राकेश बी विद्यार्थ्याच्या सभोवताली पसरलेली ४९ नारळं फोडून नवा विक्रम आहे. अंगावर काटा आणणारा त्यांचा हा थराथरक व्हिडिओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतं की, राकेश जो की मार्शल आर्टचा विद्यार्थी आहे. जमिनीवर झोपला असून, त्याच्या सभोवताली खूप नारळं पसरवली गेली आहेत. त्यानंतर त्याचे शिक्षक रेड्डी हे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका मोठ्या हातोडीच्या मदतीने ती सर्व नारळं फोडत आहेत. हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर नक्की काटा उभा राहिल्या शिवाय राहत नाही.

या व्हिडिओसाठी वापरण्यात आलेली नारळ नंतर प्राण्यांना खाण्यास देण्यात आली. या व्हिडिओमध्ये अगोदर अशा विक्रमाची नोंद असलेले करमजीत सिंग आणि कवलजीत सिंग हे दोघेही आहेत.

अधिकृत साईटच्या वृत्तानुसार, नव्या विक्रमाची नोंद १५ सप्टेंबर रोजी झाली आहे. या साईटवर हे देखील सांगण्यात आले आहे की, मार्शल आर्टमध्ये पारंगत असलेले प्रभाकर रेड्डी पी आणि राकेश बी यांच्या नावावर या अगदोर देखील या क्षेत्रातील अनेक विक्रमांची नोंद आहे.