मृत्यू कधी आणि कसा येईल सांगता येत नाही. अगदी काही क्षणाचा खेळ. पण, अनेकजण मृत्यूला धडक देऊन परत येतात. अशीच एक थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दिल्लीतील गुरुग्राममध्ये ही घटना घडली आहे. गार्डनमध्ये काम करणारे चार मजूर अचानक पाऊस सुरू झाला म्हणून आसऱ्यासाठी एका झाडाखाली धावले. झाडाखाली उभ्या असलेल्या चौघांवर काळाने झडप घातली, पण सुदैवाने चौघेही मृत्यूचा दारा धडक मारून मरत आले.

गुरूग्राममधील सिग्नेचर विला वाटिकेत ही घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी गुरुग्राम परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. यावेळी तिथे माळी काम करणारे चार मजूर वाटिकेतीलच एका झाडाखाली आसऱ्यासाठी उभे राहिले.

याच वेळी अचानक झाडावर वीज कोसळली. या वीजेच्या तडाख्यात हे चारही मजूर सापडले. उभे असलेले मजूर कोसळले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उभे असलेले मजूर आणि त्यांच्यावर वीज कोसळताना दिसत आहे. वीज पडल्यानं चौघेही बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघेही धोक्याच्या बाहेर असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, बघणाऱ्यांच्या अंगावर शहारा यावा अशीच ही घटना आहे. यात वीज कोसळताना आणि मजूर खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे.