सध्याच्या जगात तंदुरुस्तीचं वेड फारच. प्रत्येक विभागात वातानुकूलित, सर्व सोयींनी युक्त अशा ‘जिम’ पाहायला मिळतात. काही दिवस आपण गेलो की आपले ‘डोले-शोल्ले’ होतात, असं तरुण पिढीला वाटतं. पण व्यायाम कशाशी ‘खातात’ हे मात्र त्यांच्या गावी नसतं. कुणी सांगतं अमुक करा, म्हणून डोळे बंद करून ते व्यायाम आणि आहार करतात आणि आपण ‘मि. युनिव्हर्स’ होऊ शकतो, या मृगजळात ते स्वत:च्या शरीरावर अत्याचार करतात. बॉडी बिल्डींगच्या नावाखाली आज अनेक तरुण दिवसातील अनेक तास व्यायामशाळेत घालवताना दिसतात. अनेकजण तर काही हजारांची फी भरुन, चांगला ट्रेनर आणि आहारामध्ये बदल करुन देखणं शरीर मिळवण्यासाठी घाम गाळताना दिसतात. मात्र अशाप्रकार केवळ छान डौलदार शरीर कमवण्यासाठी पैसे आणि वेळ देणं एखाद्या रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीला शक्य नाही. कारण दिवसाच्या शेवटी पोट कसं भरावं असा मोठा प्रश्न असताना शरीराकडे विशेष लक्ष देण्यासाठी अशा व्यक्तींकडे वेळच नसतो. मात्र असं असतानाही दिवसभर राबून, काबाड कष्ट करुन रोजंदारी करणाऱ्या मजुरांची शरीरंही अगदी बळकट, दणकट आणि जीममध्ये जाणाऱ्यांनाही लाजवतील अशी असतात. असेच काही फोटो फोटो सध्या सोशल नेटवर्किगवर व्हायरल होत आहे.

 (फोटो सौजन्य: फेसबुकवरुन साभार)

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?

हे फोटो सत्यप्रकाश पांडे यांनी काढला असून अशिष सागर या व्यक्तीने फेसबुकवर शेअर केला आहे. फोटोत दिसणारी व्यक्ती ही लुंगीमध्ये असून या व्यक्तीचे अगदी एखाद्या बॉडी बिल्डरप्रमाणे असणारे शरीर लगेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोवरुन केवळ जीममध्ये जाऊन, ट्रेनर्सची मदत घेऊन, महागडे व्यायामाचे साहित्य घेऊन, प्रोटीन सप्लिमेंटच्या मदतीने शरीर घडवता येते हा समज चुकीचा असल्याचे सिद्ध होत आहे.

(फोटो सौजन्य: फेसबुकवरुन साभार)

या व्हायरल फोटोबरोबरच्या कॅप्शनमध्ये सागरने कशाप्रकारे हे रोजंदारीवर काम करणारे मजूर केवळ भाकरी, मीठ, लसूण, मिर्ची, तळलेला कांदा यासारखे साधे पदार्थ खाऊन जगतात हे सांगितले आहे. कोणतेही पौष्टीक अन्न न घेता केवळ भाकरी आणि मिर्चीच्या जोरावर या मजुरांनी असं शरीर कमवलं आहे हे सागरने पोस्टमधून सांगितलं आहे. अनेकदा छान शरीर कमवण्यासाठी लोकं विशेष डाएटवर जातात, मात्र दुसरीकडे मिळेल ते खावून कष्टाच्या रोजावर रोजंदारी करणारे असं शरीर कमवतात, असं सागरला या पोस्टमधून सांगायचं आहे.

(फोटो सौजन्य: फेसबुकवरुन साभार)

मजूर हे घाम गाळून पैसे कमवतात तर शरीर सुडौल आणि साचेबद्ध बनवण्यासाठी अनेकजण पैसे देऊन घाम गळतात हा या रोजंदारी करणाऱ्यांमधील आणि जीमला जाणाऱ्यांमधील प्रमुख फरक असल्याचे एकाने या फोटोखालील कमेंटमध्ये म्हटलं आहे.