18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Viral Video : हा पोपट स्वतःला समजतो कुत्रा

ऐकून तुम्हीही पडाल चाट

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 1:54 PM

कुत्र्यासारखे भुंकणारा पोपट

पोपटासारखा चुरुचुरु बोलू नको, तो म्हणजे नुसता पोपट आहे असे आपण अगदी सहज म्हणतो. पोपट त्याच्या मिठू मिठू या गोड आवाजासाठी कायमच प्रसिद्ध आहे. अनेक जण पोपटाला घरात पाळतात देखील. इतकेच काय मग त्याचे खाण्यापिण्याचे लाड आणि त्याला बोलायला शिकवलेली भाषा यांचे कौतुकही अनेक घरांत होताना दिसते. मग हा पोपट घरातील इत्यंभूत माहिती आलेल्या गेलेल्याला देतो तर कधी महत्त्वाचे निरोप देण्याचे कामही तो अगदी उत्तमरितीने पार पाडतोय पण त्याचे गोड मिठूमिठू बोलणे हीच त्याची मुख्य ओळख असते.

पण हाच पोपट आपला आवाज सोडून वेगळा आवाज काढायला लागला तर? ऐकून काहीसे आश्चर्य वाटले ना? पण हो वेगळ्या प्रजातीचा एक पोपट आपला आवाज सोडून चक्क कुत्र्याचा आवाज काढतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. आता हा आवाज काढायला त्याला कोणी शिकवले? कि कुत्र्यांबरोबर राहील्यामुळे तो असा आवाज का? याबाबत काही सांगता येत नसले तरीही या पोपटाचा आवाज सोशल मीडियावर भलताच गाजत आहे.

यावरुन सध्या काही जोकही फिरत आहेत. यातील सर्वात गाजणारा जोक म्हणजे, या कुत्र्याचा आवाज काढणाऱ्या पोपटाला मांजर पाहते. त्यावेळी तिचे पिलूही तिच्यासोबत असते. तेव्हा ती आपल्या पिलाला म्हणते. मी तुल म्हणत होते ना फॉरेन लँग्वेज शिक. त्याचा असा फायदा होतो.

पांढऱ्या रंगाचा असलेला हा पोपट तुरुतुरु चालत भुंकत आहे. त्यामुळे त्याला पाहिले नाही तर एखाद्याला कुत्रे आले असाच भास होईल. या अनोख्या पोपटाचा रंग पांढरा आहे. त्याची चोच आणि पाय काळे असून त्याच्या डोक्यावर पिसांचा विशिष्ट प्रकारचा तुरा असल्याचे आपल्याला दिसते. त्याचे चालणेही अतिशय डौलदार आहे.

First Published on August 13, 2017 1:54 pm

Web Title: viral video parrot barks like a dog white color