News Flash

Viral Video : संगीतसोहळ्यातील नववधूचा परफॉर्मन्स पाहून नवरदेवाला झाले ‘लव्ह अॅट सेकंड साइट’

मैत्रिणींनीही यात तिला उत्तम साथ दिली

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे (छाया आणि व्हिडिओ सौजन्य : Shaista/ youtube)

जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतंय, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट मुलींसाठी असू शकत नाही. मैत्रिणींच्या लग्नात सारी हौसमौस पूर्ण करून घ्यायची, तिच्या लग्नात अमूक करायचं, तमूक करायचं असे मुलींचे प्लान सुरू होतात. त्यातून नवरीच्या संगीत कार्यक्रमात तिच्या सखींचं एखाद्या गाण्यावर नृत्य नसेल तर त्याला मज्जा नाही हेही तितकंच खरं. लग्नाच्या हंगामाला सुरूवात झाली आहे, त्यामुळे हल्ली सोशल मीडियावर काहीना काही नवं पाहायला मिळतं, यावेळी आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

२०१७ मधला सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द माहितीये?

एक नववधू आपल्या मैत्रिणींसोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहे, बॉलिवूडमधल्या काही निवडक गाण्यांवर तिनं जमलेल्या सर्व मंडळींसमोर छान नृत्य सादर केलं. तिच्या जिवाभावाच्या मैत्रिणींनीही यात तिला उत्तम साथ दिली. जमलेल्या प्रत्येकांनीच अगदी होणाऱ्या नवरदेवांनाही तिच्या प्रयत्नाला दाद दिली. तिचा डान्स पाहून नवरदेवाला ‘लव्ह अॅट सेकंड साइट’ झालं नसेल तर नवल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ युट्युबवरही आतापर्यंत ४० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आता तुमच्या जवळच्या मैत्रिणींच्या लग्नातही तुम्हाला काही हटके करायचे असल्यास हा व्हिडिओ नक्कीच पाहा! कदाचित तुम्हाला यापेक्षाही काहीतरी हटके सुचेल.

Video : तिचं इंग्रजी ऐकलं तर ब्रिटिशही लाजतील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 11:07 am

Web Title: viral video this bride fabulous sangeet performance with her besties
Next Stories
1 २०१७ मधला सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द माहितीये?
2 सचिनने ‘त्यांना’ही दिला हेल्मेट घालण्याचा सल्ला
3 Video : तिचं इंग्रजी ऐकलं तर ब्रिटिशही लाजतील
Just Now!
X