News Flash

‘बघावं की खावं एकच सवाल आहे’, शेफ विष्णू मनोहरांचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

पंगतीतला 'नटसम्राट'!

शेफ विष्णू मनोहर

‘To be or not to be that is the question…जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ‘नटसम्राट’ मधील हे प्रसिद्ध संवाद तुम्हा सगळ्यांनाच आठवत असतील. हेच संवाद प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या तोंडी पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं आले तर?

सध्या विष्णू मनोहर यांचा ‘बघावं की खावं एकच सवाल आहे डायटिंग’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. पंगतीत बसलेला ‘नटसम्राट’ उर्फ शेफ विष्णू मनोहर यांनी डायटिंगच्या कात्रीत सापडलेल्या खव्वयांची नेमकी व्यथ्या काय होते? ती व्यथा इतक्या मिश्किलपणे मांडली आहे की सलग दीड मिनिटं ही व्यथा ऐकतानं चेहऱ्यावर नकळत हसू उमलतं. या व्हिडिओला चांगलींच दाद खव्वयांकडून सोशल मीडियावर मिळताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हीही पाहा ‘नटसम्राट’ शेफचं ‘बघावं की खावं एकच सवाल आहे डायटिंग’ व्हिडिओ आणि तो कसा वाटला? ही प्रतिक्रिया द्यायला मात्र नक्की विसरू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:03 pm

Web Title: vishnu manohar video goes viral on social media
Next Stories
1 Video : टीम कोहलीचं सोशल मीडियावर सुरू आहे ‘विराट’ प्रमोशन
2 Social viral : या मुस्लीम मुलीच्या अस्खलित मराठीनं जिंकली सगळ्यांची मनं
3 याड लावणारं हे ‘खुळं’ आलं कुठून?
Just Now!
X