News Flash

Viral Video: “ये हम हैं, ये हमारी गन हैं और…”; इंडियन आर्मीच्या जवानांचा ‘पावरी’ व्हिडीओ पाहिलात का?

भारतीय जवान कोणत्याही परिस्थितीमध्ये एन्जॉय करत असतात, असं एकाने म्हटलं आहे

(फोटो सौजन्य: ट्विटर व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)

सोशल नेटवर्कींगवर मागील काही दिवसांपासून ‘पावरी हो रही हैं’ ट्रेण्ड चांगलाचं धुमाकूळ घालत आहे. २०२१ मधील हा पहिलाच सर्वात मोठा ट्रेण्ड ठरतोय. भारत आणि पाकिस्तानमध्येही या ट्रेण्डचा चांगलाच बोलबाला आहे. सर्वसामान्यांपासून ते ब्रॅण्ड आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण या ट्रेण्डमध्ये सहभागी झालेत. अगदी काही ठिकाणच्या पोलिसांनाही या ट्रेण्डमध्ये अगदी मजेदार पद्धतीने आपला सहभाग नोंदवलाय. असं असतानाच आता भारतीय लष्करातील जवानांनाही या ट्रेण्डला फॉलो करत एक मजेदार व्हिडीओ शूट केला असून सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय लष्करामधील एक जवान दानानीर मोबीन या तरुणीची नक्कल करताना दिसत आहे. दानानीर हिच्याच पार्टीऐवजी पावरी उच्चारावरुन हा ट्रेण्ड सुरु झाला होता. व्हिडीओमधील भारतीय जवान हे एका बर्फाळ प्रदेशामध्ये हातामध्ये बंदुका घेऊन सीमांचे रक्षण करताना दिसत आहे. या व्हिडीओमधील एक जवान, “ये हम हैं, ये हमारी गन हैं और हम याहा पेट्रोलिंग कर रहे हैं” असं म्हणताना दिसतो. या व्हिडीओमधील जवान कॅमेरा फिरवून ते कुठे तैनात आहेत याची झलकही व्हिडीओमध्ये दाखवताना दिसतो.

आयएएस अधिकारी असणाऱ्या अविनाश सारन यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो अधिक व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा या ट्रेण्डमधील सर्वोत्तम व्हिडीओ असल्याचे म्हणत सैनिकांचे कौतुक केलं आहे.

नेटकऱ्यांचे म्हणणे काय पाहुयात…

१)सर्वात भारी

२) हे लोकं सारी काही एन्जॉय करतात

३) हे लोकं महान आहेत

४)आतापर्यंतचं सर्वोत्तम

५) तुम्हाला अधिक ताकद मिळो

६)एकदम कूल

७) सलाम तुम्हाला

८)ओरिजनलपेक्षाही उत्तम

९)आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धन्यवाद

१०) मी २३ वेळा पाहिला

मागील अनेक दिवसांपासून हा ट्रेण्ड चर्चेत असून अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता शाहीद कपूर यासारख्या बड्या कलाकारांंनीही सोशल नेटवर्किंगवरुन या ट्रेण्डच्या ‘पावरी’मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 9:56 am

Web Title: watch jawans join pawri ho rahi hai challenge and twitterati are loving it scsg 91
Next Stories
1 Video : “मलाही शिकव ना”, राशिदने मारलेल्या अनोख्या षटकारावर इंग्लंडच्या सारा टेलरची मजेशीर प्रतिक्रिया
2 ‘आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!’ स्पर्धेतील टॉप १००
3 यावरुन तुमच्या सडलेल्या मानसिकतेचा अंदाज येतो; थरुर यांनी भाजपावर केलेल्या टीकेवरुन संतापले मोहनदास पै
Just Now!
X