भोपाळमधील संजीव श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ रातोरात व्हायरल झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर संजीव श्रीवास्तव ‘डान्सिंग अकंल’ म्हणून सोशल मीडिया आणि छोट्या पडद्यावर झळकत आहेत. डान्सिंग अकंलनंतर आता एका आजी-आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांचा डान्स पाहणारा प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतोय.

या आजी-आजोबांनी साधासुधा नव्हे तर ‘बॉल डान्स’ केला आहे. त्यांचा डान्स सर्वांना तोंडात बोटं घालायला भाग पाडतोय. दोघेही एका पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहे. बरं या दोघांचं वय हा तर आश्चर्याचा मुद्दा आहेच सोबतच या दोघांनी साधासुधा डान्स नाही तर चक्क बॉल डान्स केलाय.

कर्नाटक येथील आदर्श हेगडे यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. आजी-आजोबा पारंपारिक पेहरावात दिसत आहेत. केनी लॉगिंस यांच्या क्‍लासिकल गाण्यावर आजी-आोजोबांनी ‘बॉल डान्स’ करत आहेत. आतापर्यंत १६ लाख लोकांनी या व्हिडीओल पाहिले आहे तर २७ हजारपेक्षा आधिक जणांनी शेअर केला आहे.