News Flash

World Cup 2019: पाकिस्तानच्या विजयानंतर सानिया मिर्झाचं ट्विट, शोएब मलिक ट्रोल

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला

Pak vs NZ ICC World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर, पाकिस्तानने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली आहे. या विजयासह पाकिस्तानचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अद्याप कायम आहे. दरम्यान या विजयानंतर भारतीय टेनिस स्टार आणि पाकिस्तानी क्रिकेट शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने ट्विट करत पाकिस्तानी संघाचं अभिनंदन केलं. पण यामुळे शोएब मलिकला ट्रोल व्हावं लागत आहे.

भारताविरोधात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. पण पाकिस्तानी संघाने दमदार पुनरागमन करत आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर सानिया मिर्झाने ट्विट करत खेळ किती अविश्वसनीय असू शकतो असं म्हटलं.

मात्र यावरुन नेटकऱ्यांनी शोएब मलिकला टार्गेट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी शोएब मलिक संघात नसल्यानेच पाकिस्तानी संघ जिंकला असा टोला लगावला आहे.

Next Stories
1 VIDEO: रेल्वे रुळ ओलांडण्याचा वेडेपणा जीवावर बेतला असता पण…
2 मिठीत बाप-लेकीचा अंत! मृतदेहाचा फोटो पाहून संपूर्ण जग हळहळलं
3 बडी गलती कर दी गालिब ! जेव्हा राज्यसभेत मोदींचा शायराना अंदाज फसतो
Just Now!
X