जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जगभरात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून आता हे लोन लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. तंबाखूमुळे हृदयरोग, रक्त वाहिन्‍यांचे विकार, छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका येणे, मेंदूचे विकार, पायाचा गँगरीन असे अनेक प्रकारचे विकार होतात. त्यामुळे तंबाखू सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा केला जातो.

आज तंबाखू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक पदार्थ मानला जात असला, तरी कधीकाळी तंबाखूचे सेवन औषध म्हणून केले जात होते. सोळाव्या शतकात तंबाखूला ‘द होली हर्ब’ म्हणजेच पवित्र वनस्पती असे म्हटले जात असे. १८८७ साली डच वैद्यकीय संशोधक ‘गिल्स एव्हेरार्ड’ यांनी तर आपल्या एका संशोधनामार्फत तंबाखूचे औषधी उपाय सिद्ध करून दाखवले दाखवले होते. दरम्यान त्यांनी ‘पॅनासिआ’ नामक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी “तंबाखू हे वैश्विक औषध असून त्याच्या धुरात विष आणि संसर्गजन्य रोगांसाठीची प्रतिजैवके आहेत. तंबाखूचा योग्य वापर लोकांना करता आला तर त्यांना डॉक्टरची गरज भासणार नाही” असे म्हटले आहे.

Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

अमेरिकेचा शोध लावणाऱ्या क्रिस्टोफर कोलंबस यानेही तंबाखूच्या औषधी गुणांची प्रचंड स्तुती केली होती. आपण आज क्युबा, हैती, बहामास म्हणतो, त्या बेटांवरचे लोक तंबाखू पाईपमध्ये टाकून ओढायचे. तसेच ही मंडळी एखादी जागा निर्जंतुक करण्यासाठी आणि रोग दूर करण्यासाठी तंबाखूची पाने जाळायची. तसेच आज ज्याला आपण व्हेनेझुएला म्हणून ओळखतो तिथे पूर्वी चुनखडीमध्ये तंबाखू मिसळून त्याचा टूथपेस्ट म्हणून वापर व्हायचा. अशी माहिती ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन’ या नियतकालिकात ‘प्रा.अनी कार्लटन’ यांनी लिहिलेल्या लेखात दिली आहे. ‘वेलकम कलेक्शन’ या आरोग्यविषयक संग्रहालय आणि वाचनालयाच्या माहितीनुसार १६ व्या शतकात मृतदेहाचा अंगाला लागलेला वास घालवण्यासाठी आणि मृतदेहातून पसरणाऱ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ नये यासाठी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मुक्तपणे धुम्रपान करण्याचा सल्ला दिला जात असे. त्याकाळी अनेकांना तंबाखूचा वापर उपयोगी वाटत असला तरी आज मात्र तंबाखू अत्यंत घातक पदार्थ म्हणून ओळखला जातो.