News Flash

स्वीडनमध्ये बनवले बर्फापासून हॉटेल

वर्षाच्या १२ महिने हे हॉटेल सुरू राहणार आहे

हे हॉटेल बनवण्यासाठी ३० हजार लिटर पाणी वापरण्यात आले होते.

तुम्ही ‘डिझ्ने’चा ‘फ्रोझन’ हा अॅनिमेटड चित्रपट पाहिला होता का? ज्यात राजकुमारी बर्फापासून राजमहाल बनवते. या महालात भिंतींपासून ते पाय-यां, खुर्च्या, टेबल सारे काही बर्फापासून बनवले असते. ही कल्पना आता स्वीडच्या एका हॉटेलने प्रत्यक्षात आणले आहे. हे हॉटेल पूर्णपणे बर्फापासून बनवण्यात आले असून त्यातल्या इंटिरिअर पासून एकूण एक गोष्ट बर्फापासून बनवल्या आहेत. ४० हून अधिक कलाकारांनी मेहनत घेऊन  यातली प्रत्येक गोष्ट बनवली आहे.

स्वीडनमध्ये ‘आईसहॉटेल ३६५’ हे नवे हॉटेल सुरु करण्यात आले आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे बर्फापासून बनवण्यात आले आहे. टॉन्रे नदीच्या काठावर हे हॉटेल बांधण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये बर्फापासून बनवलेले जीने, झुंबर, टेबल, खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. या हॉटेलमध्ये २० हून अधिक खोल्या आहेत.  स्वीडनमधील प्रसिद्ध ४० कलाकारांनी मिळून या हॉटेलमधली आंतरिक रचना केली आहे. हिवाळ्यात अशी अनेक हॉटेल्स येथे खुली केली जातात. पण हे हॉटेल वर्षाच्या ३६५ दिवस सुरू राहणार आहे. म्हणूनच या हॉटेलचे नाव आईसहॉटेल ३६५ ठेवण्यात आले आहे. या हॉटेलमल्या बर्फाच्या रचना वितळू नये यासाठी तिथे विशेष सोय करण्यात आली आहे.
हे हॉटेल बनवण्यासाठी ३० हजार लिटर पाणी वापरण्यात आले होते. उन्हाळ्यात हे हॉटेल वितळू नये यासाठी त्यावर छप्पर चढवण्यात आले असून त्यावर वर्षाचे बाराही महिने बर्फ असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 7:12 pm

Web Title: worlds first icehotel opens in swedish lapland
Next Stories
1 राजकुमाराच्या नजरेतून दुबई दर्शन
2 जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत १०५ वर्षीय भारतीय महिलेचा समावेश
3 ..म्हणून पॅरिसमध्ये सार्वजनिक वाहतूक केली मोफत
Just Now!
X