22 November 2017

News Flash

जगातील सर्वात वृद्ध पांडाचा चीनमध्ये मृत्यू

त्याला मिळायची सेलिब्रिटींसारखी वागणूक

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 6:17 PM

नुकताच मृत्यू झालेला बासी पांडा

चीनमधील प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या बासी या पांडाचा मृत्यू झाला आहे. बासी हा जगातील सर्वात वयस्कर पांडा म्हणून ओळखला जात होता. फुझोऊ भागात असणाऱ्या रिसर्च अँड एक्सचेंज सेंटरमध्ये त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. ३७ वर्षांच्या या पांडाला श्रद्धांजली वाहताना अनेक जण भावूक झाले होते. इतकेच नाही तर त्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंगही करण्यात आले.

हा पठ्ठ्या रोज पिझ्झा खातो; तरीही वजन कमीच!

बासी चीनमध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याला या प्राणीसंग्रहालयात एखाद्या सेलिब्रिटींसारखी वागणूक दिली जायची. त्याचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. १९९०मध्ये झालेल्या पहिल्या आशियायी खेळांच्या स्पर्धेचा शुभंकरही बासी पांडावरून तयार कऱण्यात आले होते. काळा आणि पांढऱ्या रंगाचा हा पांडा दिसायलाही अतिशय मोठा आणि देखणा होता.

Viral : ‘त्या’ एका फोटोने मुलीचे आयुष्यच बदलले!

बासी हा पांडा वयाच्या साधारण पाचव्या वर्षापासून फुओझुमधील प्राणीसंग्रहालयात राहत होता. जंगलात रहात असताना हा पांडा एका नदीत पडला होता. त्यावेळी त्याला यशस्वीपणे बाहेर काढण्यात आल्यानंतर तो या प्राणीसंग्रहालयातच राहत होता. तो ज्या ठिकाणी सापडला त्या परिसरावरून त्याचे नामकरण बासी असे करण्यात आले. १९८७ मध्ये बासी अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयातही काही काळासाठी वास्तव्याला होता.

First Published on September 14, 2017 6:17 pm

Web Title: worlds oldest giant panda dies in china named basi