अमेरिकेत एका वासराला पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. इतर वासरांच्या तुलनेत या वासराचं वजन फक्त 4.5 किलो आहे. हे जगातील सर्वात छोटं वासरु असल्याचं सांगितलं जात आहे. या वासराचं नाव Lil’ Bill आहे. वासराचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेचच पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं. वासरु अशक्त असावं अशी शंका त्याच्या मालकाला होती. पण रुग्णालयात आणलं असता वासरु एकदम फीट असून, फक्त इतरांच्या तुलनेत उंचीने लहान असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

रुग्णालयात वासराला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमा झाली होती. डॉक्टरांनी फेसबुक पेजवर वासराचा फोटो अपलोड करत अनेकदा काही गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करुन सोडतात असं लिहिलं आहे. Lil’ Bill त्यापैकीच एक आहे. या वासराचं वजन नुकताच जन्म घेणाऱ्या वासरांच्या तुलनेत दहा पट कमी आहे.

वासरु इतकं छोटं कसं काय आहे याची डॉक्टर चाचपणी करत आहेत. वासरु इतकं व्हायरल झालं होतं की #LilBill असा हॅशटॅगही सुरु झाल होता. अनेकांनी वासराच्या फोटोवर प्रतिक्रिया देत छान आणि गोंडस असल्याचं म्हटलं आहे.

Lil’ Bill च्या आधी ऑस्ट्रेलियातील एक गाय चांगलीच चर्चेत आली होती. ही जगातील सर्वात मोठी गाय असल्याचं सांगितलं जात होतं. या गाईची उंची 6 फूट 4 इंच आणि वजन 1400 किलो इतकं होतं.