Viral video: पिसाळलेला घोडा, रेडा, बैल, गाय यांना आवरणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. अशा प्राण्यांच्या जवळही कुणी जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि गेलं तरी त्याचं काय होईल, या कल्पनेनंच घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. राजधानी दिल्लीतील देवळी भागात आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय सुभाष झा यांच्यावर गायीने हल्ला केला. त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पिसाळलेल्या प्राण्यांसमोj जाणं, त्यांना आवरण्याचा प्रयत्न करणं यासाठी मोठं धाडस हवं. त्यातही तो प्राणी आवरला नाही, तो जास्तच आक्रमक झाला तर त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकतं. असंच या व्यक्तीसोबत झालं आणि अखेर गायीच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. याचा समोर आलेल्या व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गायीने व्यक्तीच्या छातीवर आणि पोटावर पायाने हल्ला केला. सुभाष बसस्थानकावर मुलांची वाट पाहत होते. त्यानंतर गायीने त्यांच्यावर हल्ला केला. सुभाष पळून जाण्यासाठी पळत असताना गाय त्याच्या मागे धावली आणि त्याला खाली पाडले. त्यानंतर गायीने त्यांच्यावर हल्ला केला. २ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये गाय त्यांच्यावर सतत हल्ला करत असल्याचे दिसून येते. यावेळी सुभाषचा मुलगा आणि तिथे उपस्थित असलेले लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तोही गायीपासून वाचण्यासाठी पळत होता. पण गाईने त्यांच्यावर हल्ला करणे सोडले नाही. गायींना हाकलण्यासाठी लोकांनी लाकडाचाही वापर केला. पण सुभाष बेशुद्ध होईपर्यंत गायीने हल्ला सुरूच ठेवला.

उपचारासाठी लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी एम्समध्ये पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तो मूळचा बिहारचा असून एका खासगी बँकेत फायनान्सर म्हणून काम करतो. तर त्यांची पत्नी फरिदाबाद येथील एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भोजपुरी गाण्यांवर विदेशी महिलांनी धरला ठेका; लग्नाच्या वरातीतला जबरदस्त VIDEO एकदा पाहाच

सध्या पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डीसीपी म्हणतात की, गायीचा मालक कोण आहे किंवा ती भटकी गाय आहे का याचा शोध घेत आहे. मालक आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. डीसीपी अंकित चौहान यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास टिग्री पोलिसांना बत्रा हॉस्पिटलमधून माहिती मिळाली. सुभाषचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर बालाजी यांनी सांगितले की, हृदय आणि बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, सुभाषच्या बरगड्या पूर्णपणे तुटल्या आहेत.