Viral video: सोशल मीडियावर आपल्याला डान्सचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. कोणी लग्नात कोणी भर रस्त्यावर तर कधी ट्रेनमध्येही डान्स करतानाचे व्हिडिओ आत्तापर्यंत समोर आले आहेत. ज्यामधील अनेक व्हिडिओंनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये नृत्याची एक वेगळीच आवड निर्माण झाली आहे. पण भारतातील अनेक गाणी लोकांना नाचायला लावतात. जेव्हा आपण एखाद्या परदेशी माणसाला भारतीय संस्कृतीचं भाग होताना आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो.

हा व्हिडिओ पाहून देखील असंच काहीसं होईल. कारण काही विदेशी महिलांना भोजपुरी गाण्यांची भुरळ पडलीय. एवढंच नाहीतर त्यांनी या गाण्यांवर चक्क ठेकाही घेतला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता विदेशी महिला एका भारतातील एका लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.यावेळी डीजेवर भोजपुरी गाणी लावली होती, त्यावर विदेशी महिलांनी ठेका धरला. विविध प्रातांतील भाषेनुसार त्यांची स्वतंत्र अशी अनेक गाणी सुद्दा फेमस आहे. या विदेशी महिलांना या लग्नाच्या वरातीतील गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनी बिनधास्त गाण्यावर ठेका धरला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रसिद्धीसाठी काहीही! रिलसाठी तरुणी उंच इमारतीवरुन खाली लटकली; हृदयाचा ठोका चुकवणारा Video व्हायरल

निर्भीडपणे नाचणाऱ्या या महिलांची सोशल मीडियावर चर्चाच चर्चा सुरु झालीये. हा व्हिडिओ पाहून लोक स्वत:ला त्या महिलेचं कौतुक करण्यापासून रोखू शकत नाहीत. या गोंडस व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. हा व्हिडीओ  उत्तर प्रदेशमधला असून scorpio_lover_0808 नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.  हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. आजकाल परदेशांत राहणारे लोक भारतीय सणांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात, त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे