भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते सर्वत्र आहेत. पण त्याच्या सर्वात मोठ्या वयोवृद्ध चाहत्यांपैकी हा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जानकी पती, जी माजी भारतीय क्रिकेट कर्णधारा धोनीची कट्टर चाहती आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या सामन्यात सहभागी झाली होती आणि धोनीला मैदानावर लाइव्ह पाहिल्यानंतर तिचा उत्साह आवरता आला नाही. या महिलेने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर केला असून धोनीबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. धोनीच्या ८२ वर्षीच्या महिला चाहतीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांना प्रेरणा मिळते आहे.

एक वृद्ध महिला क्रिकेट स्टेडियमवर पोहोचली

इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, जानकीने धोनीचे कौतूक आणि चाहती म्हणून त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. व्हिडिओमध्ये महिला चेन्नई सुपर किंग्जचा थेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. ती धोनीला प्रोत्साहत देत होती. “मी ८२ वर्षाची आहे, मी येथे धोनीसाठी आले”, असे लिहिले एक बॅनर महिलेने हातात घेतलेला दिसत आहे, ज्यावर लिहिले आहे, मी इथे फक्त धोनीसाठी आली आहे. हा व्हिडिओ जेवढा खास आहे, तेवढीच सुंदर कॅप्शनही महिलेने दिले आहे.

हेही वाचा – “अहो ताई, जरा सांभाळून….”, झाडावर चढून नाचतेय ही तरुणी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

कॅप्शनमध्ये महिलेने लिहिले, “प्रिय माही, – मी ८२ वर्षा वृद्ध आहे. कायम तुझी चाहती, सर्वात मोठी चीअरलीडर राहिलेली आहे. माझ्या चाळीशीच्या मध्यभागी एक व्यस्त काम करणारी स्त्री म्हणून, मी अनेकदा काम, मुले आणि संपूर्ण घर सांभाळण्यात थकून गेले होते. पण सचिनला मैदानावर खेळताना पाहणे आणि त्याला भेटणे हे माझे सर्वात मोठे स्वप्न होते. जेव्हा मी धोनी पाहते तेव्हा मला तीच आनंदाची लहर अनुभवता येते. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्याच्याकडे स्क्रीनवर नजर टाकते तेव्हा सर्व काही माझ्यासाठी थांबते, परिस्थिती कशीही असो. जेव्हा मी माझ्या कुटुंबाकडून ऐकले की आम्ही त्याला केवळ पडद्यावरच नव्हे, तर प्रत्यक्षपणे मैदानावर जाऊन सामना पाहणार आहोत, तेव्हा तीच वीज, तीच कौतुकाची भावना आणि आनंद मला जाणवला. ज्यामुळे माझ्यासाठी सर्व काही थांबवले. माझा थकवा, माझे वय, माझे ८२ वर्षांचे नाजूक शरीर. तु उत्तम कामगिरी करत आणि आमचे तुझ्यावर असलेले सर्व प्रेम घेऊन जा.”

हेही वाचा – वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

नेटिझन्सनी केला प्रेमाचा वर्षाव केला

ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून ते ६.४ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि ६२,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर नेटिझन्सनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने म्हटले की, ‘मी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, त्यांचे हास्य आणि उत्साह सदैव राहो.’ दुसरा म्हणाला, ‘अरे, मी पाहिलेली सर्वात सुंदर रील.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘धोनीने त्याला एक कप कॉफीसाठी आमंत्रित करावे.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला एमएस धोनी चाहत्यांमध्ये लोकप्रिय व्यक्ती आहे. त्याच्या शांत वर्तनाने आणि मैदानावरील अपवादात्मक कौशल्यामुळे त्याला अनेक प्रशंसक मिळाले आहेत आणि जानकी पती नक्कीच त्यापैकी एक आहे.