जानेवारी २०२४मध्ये, ॲडम (नाव बदलले आहे) वर्षाला सुमारे ७० लाख रुपये कमवत होता आणि त्याच्या नावावर ११८०० डॉलरचे म्हणजे ९८ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज होते. पण वर्षाच्या अखेरीस, त्याने त्याचे वार्षिक उत्पन्न दुप्पट केले आणि कर्जातून सुमारे ४२ लाखांची परतफेड केली. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, उत्पन्न दुपट्ट करून ॲडमने त्याचे वर्षाला १,७०,००० डॉलर म्हणजेच साधारण १.४ कोटी रुपये कमावले आहेत. आपलं कर्ज फेडण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ॲडम एकावेळीस दोन नोकरी करत होता. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. इथे लोकांना एक नोकरी झेपत नाही तिथे हा व्यक्ती दोन नोकरी कसा करत होता असा प्रश्न लोकांना पडला आहे.

बिझनेस इनसाइडरच्या वृत्तनुसार, ॲरिझोना, यूएस मधील सिक्योरिटी रिस्क-व्यावसायिक म्हणून ॲडम आधीपासून पूर्णवेळ नोकरी करत होता. ॲडमला त्याच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नावर समाधान वाटत नव्हते आणि त्याने त्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी दुसरी रिमोट नोकरी स्वीकारली. काही अतिरिक्त पैशांसाठी DoorDash सारख्या फुड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीसह काम करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला लक्षात आले की, ते पूर्वीप्रमाणे फायदेशीर नाहीत म्हणून त्याने इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली.

त्या डिसेंबरमध्ये, एका YouTube व्हिडिओमुळे त्याला गुप्तपणे एकाच वेळी अनेक रिमोट नोकरी करण्याची कल्पना मिळाली ज्यामध्ये एकाचवेळी अनेक रिमोट नोकऱ्या कशा हाताळायच्या हे स्पष्ट केले होते. ॲडमला एकाच वेळी दोन करू शकतो असा विश्वास होता. यामागे त्याचे दोन उदिष्ठ होते, त्याला त्याचे उत्पन्न दुपट्ट करायचे होते आणि दोन वर्षात कर्ज फेडायचे होते. लिंक्डइनवर त्याचे प्रोफाइल पाहिल्यानंतर एका रिक्रूटरने त्याला कॉल केला. त्यानंतर दोन मुलाखती झाल्या आणि फ्रेब्रुवारीमध्ये त्याला दुसरी नोकरी मिळाली.

हेही वाचा – “अहो ताई, जरा सांभाळून….”, झाडावर चढून नाचतेय ही तरुणी, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

ॲडमने दिला सल्ला

दोन ठिकाणी काम केल्यामुळे एडम आता चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्याने शैक्षणिक कर्जही फेडण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याने चार महिने पुरेल इतका एमरजन्सी फंड देखील तयार केला आहे. ॲडम प्रत्येक आठवड्याला जवळपास तीस ते साठ तास काम करतो. ॲडमने दोन ठिकाणी काम करण्यासाठी काही टिप्स तयार दिल्या आहे. जर एक जागा मीटिंग निश्चित असले, तो दुसरी मिटिंग त्यावेळी ब्लॉक करा. म्हणजे त्यावेळी कोणतीही मिटिंग प्लॅन करू नका. शिवाय एडमने टास्क ओव्हरलोड न करण्याचीही सल्ला देते. ॲडमच्यामते प्रत्येक वेळी हिरो बनून सर्व काम करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व काम व्यवस्थित विभागून घ्या. थकवा जाणवत असेल तर सिक लिव्ह वापरा.

हेही वाचा – “जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

मूनलाइटिंग म्हणजे काय?

मूनलाइटिंग म्हणजे आधीपासून एक नोकरीत असताना दुसरी नोकरी करणे किंवा साइड बिझनेस सुरू करणे. भारतात, मूनलाइटिंगची संकल्पना बेकायदेशीर नाही आणि विशिष्ट उद्योगांमध्ये सामान्य आहे जिथे व्यक्ती त्यांच्या उत्पन्नाला पूरक म्हणून अनेक नोकऱ्या करतात. मुनलाइटिंग हा भारतात अजूनही अवघड विषय आहे.