मुघलांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सहिष्णु अकबरापासून ते मराठ्यांचा कट्टर वैरी औरंगजेबापर्यंत मुघल परंपरेत अनेक व्यक्तिमत्त्वं आपल्याला  भेटत जातात. काहीही असलं तरी एका गोष्टीच्या बाबतीत सगळ्यांचं एकमत होतं ते म्हणजे मुघल साम्राज्य जगातल्या अतिशय प्रबळ साम्राज्यांपैकी एक होतं. या सगळ्या चक्रवर्ती सम्राटांच्या पायाशी प्रचंड सत्ता आणि वैभव लोळण घेत होती. या अशा प्रबळ साम्राज्याची वंशज असणारी एक मुघल राजकन्या गरिबीत दिवस काढत असेल ही कल्पना करवत नाही.

भेटा सुलताना बेगमना, ही एक मुघल राजकन्या आहे. पण सध्या ती तिचं आयुष्य कोलकातामधल्या एका झोपडपट्टीत काढते आहे. तिच्याजवळ जगण्यासाठीही पैसे नाहीत. शेवटचा मुघल बादशहा बहादुर शाह जफरची सुलताना बेगम ही नातसून आहे. १८५७ च्या उठावादरम्यान भारतीय सत्तांनी बहादूरशाह जफर याला त्यांचा बादशाह मानत त्याच्या नेतृत्वाखाली आपण इंग्रजांविरोधात उठाव करत आहोत असं जाहीर केलं होतं. उठाव फसल्यानंतर बादशाह बहादूरशाह जफर यांना अटक करत ब्रिटिशांनी त्यांची रवानगी रंगूनच्या तुरूंगात केली. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुघल सत्ताधीशांच्या उरल्यासुरल्या वंशजांना अटक करत त्यांना ठार करायला सुरूवात केली. त्यामुळे या वंशजांनी भारतातून पलायन करत अनेक देशांमध्ये आश्रय घेतला. पण सुलतानाच्या पतीचे पणजोबा या अटकसत्रातून बचावले. आज सुलताना बेगम खाण्यापिण्यापुरते पैसे कमवायला लोकांच्या घरची धुणीभांडी करतात. पैसे कमवायला भीक मागणं त्यांच्या स्वभावात नाही आणि ते त्यांच्या ‘शान के खिलाफ’ आहे.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…

Video : गाडीच्या बोनेटवरच पोलिसांनी तयार केलं ऑमलेट

आपण मोठ्या घराण्यातले असून जगण्यासाठी आपण कधीही भीक मागत नाही असं त्यांचे पती मोहम्मद बेदार बख्त यांनी त्यांना सांगितल्याचं त्या सांगतात. त्यांच्या पतीचे निधन झालं आहे.सुलताना बेगमसारख्या विपन्नावस्थेत जगणाऱ्या मुघल राजकन्येला २००३ साली सरकारने ५० हजारांची मदत केली होती. पण एवढी मदत काही त्यांना आयुष्यभर पुरेल एवढी नक्कीच नव्हती. त्यामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी  त्यांना धुणीभांडी करावी लागत आहेत.

वाचा : महिलांनो, भारतीय मुलानं तयार केलेली ही चप्पल जरूर वापरा!