प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान हरवण्याच्या किंवा बदलण्याच्या समस्या अनेकदा ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीत प्रवासी कस्टमर केअर सेंटरला फोन करतात. परंतु बहुतांश घटनांमध्ये कस्टमर केअर सेंटर प्रवाशांच्या सेवेने समाधान करण्यात असमर्थ ठरतात. यानंतर मात्र प्रवाशांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. अशाच एका प्रकरणात प्रवाशाने असा पराक्रम केला आहे की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. या प्रवाशाने आपले सामान शोधण्यासाठी एअरलाईन्सची वेबसाइट हॅक केली.

सॉफ्टवेअर इंजिनीअर नंदन कुमार पटणा ते बंगळुरूला इंडिगोच्या विमानाने जात होता. प्रवास संपवून जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीने ती बॅग पाहिली आणि सांगितले की, ही बॅग दुसऱ्याची आहे. नंदनच्या बॅगची दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगसोबत अदला-बदल झाली होती. नंदनने इंडिगोच्या कस्टमर केअरला बॅग बदलण्याबाबत माहिती दिली. मात्र कस्टमर केअर सेंटरने नंदनला त्याच्या बॅगेची माहिती दिली नाही. त्यानंतर, बॅग हरवल्याची आणि ती शोधण्याची संपूर्ण घटना नंदनने ट्विटरवर सांगितली आहे.

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

विमानतळावरून घरी आल्यानंतर नंदनने बॅग पत्नीच्या ताब्यात दिली. त्यावेळी बॅगच्या बेसला कुलूप नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. तेव्हा त्याला कळले की ही बॅग दुसऱ्याची आहे. कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हिसकडून कोणतीही मदत मिळाली नाही तेव्हा नंदनने कंपनीची वेबसाइट हॅक करण्याचा विचार केला.

नंदनने वेबसाइटचे डेव्हलपर कन्सोल उघडून नेटवर्क लॉग रेकॉर्ड तपासले. काही वेळाने त्याला ज्या प्रवाशाकडून त्याची बॅग बदलण्यात आली होती त्याची माहिती मिळाली. त्याला नेटवर्क रिस्पॉन्सद्वारे संबंधित प्रवाशाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळाले.

नंदनने सांगितले की, ज्या प्रवाशासोबत त्याची बॅग बदलली होती तो त्याच्या घराजवळच राहत होता. नंदनने त्या प्रवाशाशी संपर्क साधून बॅगा बदलल्या. बॅग मिळाल्यानंतर नंदन कुमारने विमान कंपनीला ग्राहक सेवा सुधारण्याची गरज असल्याचे सुचवले. कंपनीला आयव्हीआर निश्चित करणे तसेच, ग्राहकांचा डेटा लीक होऊ नये म्हणून आधी वेबसाइट दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले.

नंदन यांनी सांगितले की, विमान कंपनीच्या कस्टमर केअरने दावा केला होता की त्यांनी संबंधित प्रवाशाला बॅग बदलण्यासाठी तीनदा बोलावले होते. पण, नंदनने संबंधित प्रवाशाला एअरलाईन कंपनीच्या कॉलबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, त्याला इंडिगोकडून कोणताही कॉल आला नव्हता.

दरम्यान, नंदनने ट्विटरवर आपल्यासोबत घडलेली घटना सविस्तर सांगितली आहे. यावर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकजण नंदनच्या कृतीचे कौतुक करत असून ते त्यांच्यासोबत घडलेल्या घटनाही शेअर करत आहेत.