चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी अशा घटना सर्रास घडताना दिसतात. त्यामुळे गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू, पैशांच्या पाकिट चोरट्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले जाते. तरीही काही चोर इतके हुशार असतात की, ते तुमच्या नकळत तुमच्या बॅगमधून पैशांचे पाकीट चोरुन कधी पळ काढतात हे तुम्हालाही कळत नाही. सध्या सोशल मीडियावर चोरीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक काकी इतक्या हुशारीने चोरी करतात की जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात एक महिला तिच्या पतीसह वस्तू खरेदी करण्यासाठी उभे आहे, तेवढ्यात तिथे एक दुसरी महिला तिथे येते आणि येताच हुशारीने ती तिथे आधीच उपस्थित असलेल्या महिलेच्या पर्सची चेन उघडते. यानंतर ती दुकानदाराला काही सामान आणायला सांगते. दुकानदार तिने सांगितलेली वस्तू आणून देत नाही तोवर ती चोर महिला अगदी सफाईदारपणे दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून पैशांचे पाकीट काढते. यानंतर ती दुकानातून निघून जाते. महिलेने इतक्या हुशारीने चोरी केली की, पाहणारेही थक्क झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman stole from a another woman purse now the video is going viral on social media sjr
First published on: 02-04-2024 at 19:37 IST