Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून थरकाप उडतो. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट घातल्यामुळे थोडक्यात बचावला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका कारच्या खाली दुचाकी येते आणि दुचाकी चालक तरुण थेट कारच्या खाली येतो. हे पाहून आजुबाजूचे लोक धावून येतात. कार चालक थांबतो तेव्हा दुचाकी चालक तरुण कारमधून बाहेर येतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे तो जीवंत आणि ठणठणीत असतो. तो हाताने डोक्यावरील हेल्मेट काढतो. या हेल्मेटमुळेच त्याचा जीव वाचतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अनेकदा आपल्याला हेल्मेट घालण्यास सांगितले जाते पण आपण टाळाटाळ करतो पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हेल्मेट घालण्याचे महत्त्व कळेल. आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल. हा व्हिडीओ रांची शहरातला असून व्हिडीओवर लिहिलेय, “हेल्मेट घाला” ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा : संस्कृती जपणारी माणसं! डिजे नव्हे तर हरिपाठावर धरला ठेका, हरिपाठावर नाचणाऱ्या नवरदेवाचा VIDEO VIRAL

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!

ranchi_jh777 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेल्मेट घाला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या व्हिडीओतून खूप काही शिकण्यासारखे आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “या तरुणाच्या आईचा आशीर्वाद त्याच्याबरोबर होता.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हेल्मेट घालणे खूप गरजेचे आहे. हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी देवाचे आभार मानले आहे.