अफगाणिस्तानमध्ये २० वर्षांनंतर पुन्हा एकदा तालिबानचे राज्य आले आहे. अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा करताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. तसेच उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही देश सोडला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. अफगाणी नागरिक देश सोडण्याची धडपड करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका लहान मुलीचा फोटो व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

ट्विटरवर एका लहान अफगाणी मुलीचा फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो बेल्जियममधील मेल्सब्रोक लष्करी विमानतळावरील आहे. फोटोमधील चिमुकली काबूलमधून बाहेर पडल्यानंतर मेल्सब्रोक येथे पोहोचल्यावर आनंदाने उड्या मारत असल्याचे दिसत आहे. फोटोमधील चिमुकलीचा आनंद पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.

Video: हृदय पिळवटून टाकणारा अफगाणी महिलेचा व्हिडीओ, तान्ह्या बाळाला त्या आईने…

Video: अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज घेऊन जाणाऱ्या मुलाला तालिबान्यांनी रोखलं अन्…

या चिमुकलीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अनेक यूजरने तिचा फोटो ट्वीट करत आता तिचे बालपण कुणी हिरावून घेऊ शकत नाही असे म्हटले आहे. तर काहींना त्या मुलीचा आनंद पाहून आनंद झाल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : तालिबानी दहशतवादी लहान मुलांच्या पार्कमध्ये खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीची तारीख जसजशी जवळ येत आहे तशी तिथे अडकलेल्या लोकांच्या चिंतेत वाढ होत आहे. काबूल विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसात महागाई उच्चांक गाठत असल्याचे चित्र आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. काबूल एअरपोर्टवर पाण्याच्या एका बाटलीसाठी ४० डॉलर्स म्हणजेच ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर एक प्लेट राइससाठी १०० डॉलर्स म्हणजे जवळपास साडे सात हजार द्यावे लागत आहेत. विशेष म्हणजे विमानतळावर यासाठीचे पैसे डॉलर्समध्येच घेतले जात आहेत. महागाईमुळे अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.