Viral video: प्रत्येकाला आपले वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढण्याची इच्छा असते. वेगवेगळी ठिकाणे निवडून नवींनवीन पोझ देऊन फोटो काढले जातात. हटके आणि सगळ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करताना. अनेकांना त्याची किंमतही मोजावी लागते. अनेकदा त्रासही सहन करावा लागतो. सर्वत्र फोटोशूट चे प्रमाण वाढले आहे. जन्मापासून ते वेगवेगळ्या कर्यक्रमच्या माध्यमातून फोटोशूट केले जाते. सध्या असाच एका फोटोशूटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोशूटचा हटके प्रयोग त्या महिलेच्या जिवावर बेतला म्हटलं तर वावगं ठरणार नाही.राजस्थानची राजधानी जयपूरमधील आमेर पॅलेसमध्ये हत्तीवर बसणं एका विदेशी महिलेला चांगलंच महागात पडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गौरी नावाच्या हत्तीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. हत्तीने आधी रशियन पर्यटकाला आपल्या सोंडेत गुंडाळलं. त्यानंतर तिला जमिनीवर फेकलं. सुदैवाने पर्यटक हत्तीच्या पायांच्या खाली आली नाही . या अपघातात महिलेचा पाय मोडला. मात्र तिचा जीव वाचला. या घटनेनंतर प्रशासनाने हत्ती गौरीला किल्ल्यावर बंदी घातली आहे. त्या महिलेचं नशीब चांगलं होतं की सुदैवाने हत्तीनं महिलेला जास्त जखमी केलं नाही. जंगलातील अवाढव्य प्राणी म्हणजे हत्ती. हत्तीला खूप कमी राग येतो मात्र जेव्हा येतो तेव्हा त्याच्या एका हल्ल्यात माणून जमिनीदोस्त होऊ शकतो. हेच या व्हिडीओमधून पाहायला मिळालं.

या घटनेनंतर ही महिला कोणत्याही प्राण्याच्या जवळ जायला दहा वेळा विचार करेल. तसेच या विदेशी महिलेला तिचा भारत दौराही चांगलाच लक्षात राहिल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…

@MansaRajasthani नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून काहींनी महिला हत्तीवर बसलीच का असं म्हणत केलेल्या कृत्यासाठी संताप व्यक्त केलाय. मात्र हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवतोय.