तोकडे स्कर्ट घालून आणि हातात पॉम पॉम घेऊन आपल्या आवडत्या टिमला प्रोत्साहन देणा-या चिअर लिडर्स या जवळपास अनेक फूटबॉलच्या मैदानावर पाहायला मिळतात, जणू प्रेक्षकांचं मनोरंजन करणं एवढचं काम त्यांच्या खांद्यवर असतं, पण त्याच जागी तुम्हाला भांगडा डान्सर पाहायाला मिळाले तर? तुम्ही म्हणाल हे चित्र भारतातल्या एखाद्या फूटबॉल ग्राऊंडवर फारफार तर पाहायला मिळेल, पण तुमचा हा समज साफ चुकीचा आहे बरं का! कारण ऑकलंडमधल्या फुटबॉल कोर्टवर चक्क भांगडा डान्स करण्यात आला.

फुटबॉल मॅचमधल्या ब्रेकदरम्यान इथल्या प्रसिद्ध ‘भांगडा एम्पायर या ग्रुपने फुटबॉल ग्राऊंडच गाजवून सोडलं. पाच मिनिटांच्या ब्रेकमध्ये या सगळ्यांनी अनेकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावलं नसेल तर नवलच. त्यामुळे एरव्ही चिअर लिडर किंवा हिपहॉपर, पॉप डान्सर दिसण्या-या या ग्राऊंडमध्ये खास पंजाबी तडका पाहायला मिळाला. त्यामुळे परदेशातल्या फूटबॉल कोर्टवरचा हा व्हिडिओ व्हायरल झाला नाही तर नवलच. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर चोवीस तासांच्या आताच साडे तीन लाख लोकांनी पाहिला आहे.

भांगडा एम्पायर हा कॅलिफोर्नियातला प्रसिद्ध भांगडा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये कॉलेजमधले अनेक विद्यार्थी आहेत. फक्त फूटबॉल मैदानातच नाही तर या ग्रुपने व्हाईट हाऊसमध्ये ही देखील भांगडा सादर केला होता. २००८ मध्ये बराक ओबामांच्या काळात स्टेट डिनरच्यावेळी या ग्रुपने भांगडा सादर करून सगळ्यांची मने जिंकली होती.