काही लोक खूप विचित्र विचित्र पदार्थ बनवतात आणि खातातही. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करतात. या विचित्र पदार्थांना फ्यूजन फूड असेही म्हणतात. दरम्यान महाराष्ट्रात आपल्याकडे वडापावनंतरची सर्वात आवडली जाणारी दुसरी पसंत म्हणजे समोसा. हा पदार्थ प्रसिद्ध आहेच पण अवघ्या जगभरात सुद्धा याचे चाहते कोटींच्या संख्येने आहेत. त्यातील स्टफिंग आणि कुरकुरीतपणा अक्षरश: वेड लावतो. साधारणत: या समोसामधील स्टफिंग हे बटाट्याचं असतं. एक वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी यामध्ये असते. मात्र समोश्याचा आता समोर आलेला प्रकार कदाचीत तुम्ही कधीच खाल्ला नसेल. सध्या ट्विटरवर समोस्याचा एक फोटो व्यायरल होत आहे. या समोस्याचं नाव आहे, समोसा बिर्याणी. विश्वास बसत नाही ना पण हो मार्केटमध्ये आता समोसा बिर्याणी आली आहे.
मार्केटमध्ये आला बिर्याणी समोसा –
बिर्याणी हा अनेकांचा विकपॉईंट आहे. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. तुम्ही आतार्यंत व्हेज बिर्याणी, नॉनवेज बिर्याणी खाल्ली असेल मात्र समोसा बिर्याणी कधी खाल्ली आहे का? हो मार्केटमध्ये आता समोसा बिर्याणीच्या नव्या पदार्थाचा ट्रेंड आलाय. ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये समोश्यात बटाट्याचं सारण नाही तर चक्क बिर्याणी भरली आहे.यानंतर समोश्यासारखं हे तळलंसुद्धा आहे. समोसा हा पदार्थ वेजीटेरियन आणि नॉनवेजिटेरियन दोन्ही लोकं खात होते. मात्र या नव्या प्रकारच्या समोस्याला शाहाकारी लोक नाकारतील. या समोसा बिर्याणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाहा फोटो –
हेही वाचा – मी झोपलेलो नाही तर…नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांचा मजेदार खुलासा, फोटो व्हायरल
या पोस्टला आतापर्यंत 307k एवढे व्ह्युज मिळाले आहेत. तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत. बिर्याणी लव्हर तर आम्ही हा समोसा नक्की ट्राय करणार अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींनी हे असे उलट, सुलट प्रयोग करणं थांबवा अशी मागणी केली आहे.