BJP Spokeperson Beaten Video: भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांना काही वकिलांनी मारहाण केल्याचे सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाईटहाऊस जर्नालिज्मने या व्हिडीओची तपासणी केली असता, अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना मारहाण करणाऱ्यांची बाजू घेतल्याचे दिसतेय. “गौरव भाटिया अनेकदा बेताल वक्तव्य करतात त्यामुळे त्यांना बाकीच्या वकिलांनी मिळून चोप दिला आणि हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं आता पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करावी.”, अशा प्रकारच्या कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं हे प्रकरण काय हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Manjeet Ghoshi यांनी वायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत, व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून त्यातील अनेक स्क्रीनग्रॅब मिळवले. आम्ही प्राप्त केलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला. रिव्हर्स इमेज सर्च दरम्यान आम्हाला हिंदीमध्ये एक बातमी सापडली. २०१९ मध्ये ही बातमी अपलोड करण्यात आली होती. त्यात पार्किंगच्या मुद्द्यावरून वकील आणि पोलिस यांच्यात हाणामारी झाल्याचा उल्लेख आहे.

https://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/crime/reason-behind-scuffle-between-police-and-lawyers-at-tees-hazari-court-premises/articleshow/71866899.cms

या व्हिडिओमधील स्क्रीनग्रॅब इंटरनेटवर शेअर होत असलेल्या व्हिडिओशी मिळतेजुळते आहेत. त्यानंतर आम्ही या घटनेबद्दल गुगळे कीवर्ड सर्च केले. आम्हाला याबद्दल अनेक बातम्या आढळल्या.

https://www.indiatoday.in/india/story/gunshots-scuffle-delhi-police-lawyers-tis-hazari-court-1615106-2019-11-02
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/tis-hazari-court-clash-how-a-parking-tiff-snowballed-between-delhi-cops-and-lawyers/articleshow/71873179.cms

आज तकच्या व्हिडिओ न्यूज रिपोर्टमध्ये आम्हाला व्हायरल व्हिडिओमधील काही स्क्रीनग्रॅब सापडले आहेत.

https://www.aajtak.in/india/video/police-lawyers-fight-outside-delhi-tis-hazari-court-injured-additional-dcp-two-sho-981602-2019-11-03

इंडिया टुडेच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये आम्हाला व्हिज्युअल देखील सापडले.

यावरून हे सिद्ध झाले की हा व्हिडिओ अलीकडील नसून २०१९ चा आहे. मात्र, अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया आणि इतर वकिलांमध्ये नोएडा कोर्टात भांडण झाले होते, हे ही खरे आहे. गौरव भाटिया हे स्वतः माजी वकील आहेत व त्यांनी सध्या चालू असलेल्या वकिलांच्या संपाला विरोध केल्याने शाब्दिक वाद झाला होता, मात्र या व्हिडीओचा त्या वादाशी संबंध नाही.

https://www.indiatoday.in/cities/noida/story/gautam-budh-nagar-court-noia-bjp-spokesperson-advocate-gaurav-bhatia-scuffle-strike-2517292-2024-03-20

हे ही वाचा<< ‘RSS’ ने लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा केला जाहीर; Video मध्ये म्हटलं, “या देशात दोन संघ..”, नक्की खरं काय?

निष्कर्ष: २०१९ मधील व्हिडीओ, ज्यात वकील आणि पोलिस कर्मचारी यांच्यात भांडण झाल्याचे दिसत आहे. हा आता वकील व भाजपचे प्रवक्ते आणि व्यवसायाने वकील असलेले गौरव भाटिया यांना मारहाण केल्याचा दावा करत शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.