scorecardresearch

एका ग्लासमुळे नवऱ्याची झाली ‘अशी’ फजिती, पाहा व्हिडीओ!

या व्हिडीओमध्ये नवरदेवाने अजब प्रकार केला आहे. नवरदेवाने असं काही केलं की भरमंडपात त्याची पोलखोल झाली.

एका ग्लासमुळे नवऱ्याची झाली ‘अशी’ फजिती, पाहा व्हिडीओ!
(Photo: Instagram/ tube.indian)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेखालून जात असतात. त्यापैकी काही व्हिडीओ आपल्याला खिळवून ठेवतात. अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर पटकन व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडीओ लोकांचं मनोरंजन करण्याचं काम करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने अजब प्रकार केला आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लग्न समारंभातील आहे. लग्न समारंभात नवऱ्या मुलाची चांगलीच फजिती उडाली आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने असं काही केलं की भरमंडपात त्याची पोलखोल झाली. हे पाहून मंडपात असलेल्या सर्वानाच हसू आवरलं नाही. लग्नातली एक परंपरा सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. यात नवरा आणि नवरी दोघांनीही आधी स्वतः दूध पिऊन नंतर तो एकमेकांसोबत शेअर करायचा असतो. या व्हिडीओमध्ये एकमेकांच्या बाजुला बसलेले नवरा-नवरी ही परंपरा पार पडत असतात. पण ही परंपरा पार पाडत असताना नवरदेव चांगलाच गोंधळला. याच कारणामुळे बाजूला बसलेल्या नवरीला सुद्धा हसू आवरलं नाही. मंडपातील सारचे जण हसल्यानंतर नवरदेवाला आपली चूक कळली आणि त्यानंतर त्याचा चेहऱ्या पाहण्यासारखा झाला.

लग्नातील पद्धतीनुसार नवरी नवरदेवाला आपल्या हातातील दुधाचा ग्लास पुढे करत त्याला देत होती. पण नवरदेवाला भलतंच वाटलं आणि त्याने त्याच्या हातातला ग्लास चिअर्स करण्यासाठी पुढे केला. नवरीच्या हातातील दूधाच्या ग्लासला आपल्या हातातील दूधाचा ग्लास टेकवत चिअर्स करतो. मित्रांसोबत दारूच्या पार्टीत बसल्यानंतरची ही सवय त्याला लग्नातही आवरली नाही. हे पाहिल्यानंतर बाजुला बसलेल्या नवरीसोबतच भरमंडपातील सारेच जण हसू लागले. त्यानंतर नवरदेवाला आपण काही तरी गोंधळ केल्याचं लक्षात आलं.

आणखा वाचा : बंदुकीसोबत व्हिडीओ बनवल्याने खाकी वर्दी गेली; पण सोशल मीडियावर बनली स्टार

 

View this post on Instagram

 

A post shared by Tube indian (@tube.indian)

आणखी वाचा : बापरे! मुलाकडून असं काम करून घेतलं की डिलीट करावं लागलं YouTube चॅनल

नवरदेवाने ही चूक केली खरी, पण त्याला दारू पिण्याची सवय आहे हे मात्र साऱ्यांच्याच लक्षात आलं. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओला लोक आवडीने पाहत असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अशा प्रकारचे व्हिडीओ हे दररोज म्हटलं तरी आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हा धडा मिळेल, की लग्न असो किंवा इतर कुठला कार्यक्रम, आपलं काम करताना नेहमी सावध राहणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2021 at 18:05 IST

संबंधित बातम्या