एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत हळूहळू बदलत चालली आहे. इंटरनेट, मोबाईल फोन यांने हे जग एकमेकांच्या जवळ आणले आहे. संवादाची भाषाही हळूहळू बदलत चालली आहे. सोशल मीडियावर आपलीच एक शॉर्टकट भाषा तयार होत आहे. शब्दांचा वापर कमी होऊन त्याची जागा आता इमोजी घेत आहे. इमोजींमुळे संवाद अधिक चांगल्या प्रकारे साधला जातो असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या इमोजींचा अचूक अर्थ लावू शकणा-यांना लंडनमधल्या एका कंपनीने नोकरी देऊ केली आहे.

वाचा : अरेरे! कष्ट करून मिळवलेल्या पैशांचे ‘चीझ’ झाले

लंडनमधल्या एका भाषांतर करणा-या संस्थने एक जाहिरात केली आहे. या संस्थेला इमोजीचें अर्थ लावणारा भाषांतरकार हवा आहे. संवादात मोठ्या प्रमाणात इमोजींचा वापर केला जातो. तेव्हा या इमोजींचा शब्दश: अर्थ लावणारा इमोजी भाषांतरकार या संस्थेला हवा आहे. इमोजींचा वेगवेगळा अर्थ असतो. हे ट्रेंड लक्षात घेऊन त्यावर भाषांतर करणारा व्यक्ती या संस्थेला हवा आहे. संवादात वारंवार होणारे इमोजीचे वापर लक्षात घेऊन नक्कीच भविष्यात या क्षेत्रात नोकरी निर्माण होऊ शकते असे या कंपनीला वाटते. भविष्यात इमोजी भाषांतरकार हा नवा प्रकार अस्तित्त्वात येईल. शब्दांपेक्षा इमोजीतच अधिक संवाद साधला जाईल तेव्हा या भाषांतरकाराची अधिक गरज भासेल असेही या कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मेसेज टाईप करताना संवादात वापरले जाणारे इमोजींचे अर्थ अनेक असतात. एखाद्या शब्दापेक्षा अनेकदा या इमोजींचे अर्थ लावणे कठीण ठरू शकते. म्हणूनच संवादाच्या या नव्या भाषेचा या संस्थेला अधिक अभ्यास करायचा आहे. या पदासाठी लवकरच उमेदवारांना निवडण्यात येणार आहे.

VIDEO : राहुल, लालू, केजरीवालांची नक्कल घेऊन पुन्हा आलाय ‘श्याम रंगीला’