मृत्यू कधी, कुठे, कसा आणि कोणत्या रूपात येईल आणि या मृत्यूतून कोण, कधी, कसं वाचेल हे सांगू शकत नाही. कारण मृत्यू कुणाच्याच हातात नाही. रस्त्यावरुन चालणंही आता गुन्हा झाला आहे का, असाच प्रश्न पडतोय. भरधाव गाडी चालकांमुळे अनेक शहरामधील परिसरात भीतीचं वातावरण आहे. रस्त्यावरुन चालणे, धावणे अजून जीवघेणा प्रवास ठरतोय तोही या बेफामपणे गाडी चालणाऱ्या लोकांमुळे.अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.सोशल मीडियावर आपल्याला या संबंधीत काही असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका रस्त्याच्या कडेला दोन व्यक्ती झोपल्या आहेत. दोघंही गाढ झोपेत आहेत. इतक्यात एक कार येते. कारचा वेग तसा कमीच आहे. पण कारचालकाला रस्त्यावर झोपलेले हे लोक कदाचित दिसत नाहीत. त्याची कार त्यांच्या अंगावरून जाते.सुरुवातीला झोपलेल्या व्यक्तीच्या हातावरून तर पुढे झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून ही कार जाते. आपल्या गाडीखाली कुणीतरी चिरडलं हे समजताच गाडीतील व्यक्ती लगेच गाडीबाहेर येते. मात्र पुढच्याच क्षणी कारने ज्या व्यक्तींना चिरडलं ते दोघंही सुखरूप आहेत. त्यांना काही गंभीर झालेलं नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चिमुकल्याच्या अंगावरुन गेली कार, Video पाहून म्हणाल देव तारी त्याला कोण मारी!

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लटफॉर्मवरती शेअर झाला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @clipsthatgohard नावाच्या पेजने शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे आणि शेअर सुध्दा केला आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ आठ सेंकदाचा आहे, हा व्हिडीओ ९.४ मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car run over people sleeping on road car hit then miracle happens major accident video viral on social media srk
First published on: 29-05-2023 at 10:49 IST