Video: बिबट्याला पाहताच हार्ट अटॅकने गेला कुत्र्याचा प्राण; समोर आलं धक्कादायक CCTV फुटेज

आधी ही दोन भटकी कुत्री या बिबट्याकडे धावली मग बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली मात्र एकाही कुत्र्याला त्याने स्पर्श न करता तिथून पळ काढला

CCTV Footage dog died due to heart attack after seeing leopard
घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

रात्रीच्या अंधारात अचानक समोर बिबट्याला पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल. मात्र जोधपूरमध्ये अगदी आश्चर्यचकित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामान्यपणे बिबट्याने लोकवस्तीमध्ये शिरुन पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांची शिकार करणं हे काही नवीन राहिलेलं नाही. अगदी मुंबईतील आरे कॉलीनीमध्ये अनेकदा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये दिसतो. जोधपूरमध्ये मात्र एका बिबट्याला समोर पाहताच भटक्या कुत्र्याला हार्ट अटॅक आला आणि तडफडून त्याचा मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

आधी ही दोन भटकी कुत्री या बिबट्याकडे धावली मग बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली मात्र एकाही कुत्र्याला त्याने स्पर्श न करता तिथून पळ काढला, पण बिबट्याच्या रुपात मृत्यूला समोर पाहून या दोन कुत्र्यांपैकी एकाला हार्ट अटॅकचा झटका आला आणि त्याने प्राण सोडला. नक्की काय घडलं पाहुयात…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cctv footage dog died due to heart attack after seeing leopard scsg

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या