scorecardresearch

VIRAL VIDEO : चमत्कार! कुटुंबाचं सुरू होतं एकत्र जेवण, अचानक कोसळला सिलिंग फॅन, पाहा कसा वाचला मुलाचा जीव

या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेत नशीब चांगलं म्हणून एका मुलाचा जीव वाचला. ही सर्व घटना पाहताना अंगावर काटा येतो.

ceiling-fan-falls-down
(Photo: Twitter/ ipskabra)

कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी एकत्र जेवण करणं, हा एक अनोखा आनंद असतो. धावपळीच्या वेळी हे शक्य होत नसलं, तरी अनेक कुटुंबं आजही एकत्र बसून जेवण करतात. एकत्र बसून जेवणाचा हा आनंद एका कुटुंबावर जीवघेणा ठरू शकला असता. सगळी जमवाजमव करून एक कुटुंब एकत्र जेवायला बसलेलं असताना अचानक सिलिंग फॅन कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेत नशीब चांगलं म्हणून एका मुलाचा जीव वाचला. ही सर्व घटना पाहताना अंगावर काटा येतो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुटुंबातील सर्व सदस्य जमिनीवर बसून जेवण करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अचानक सिलिंग फॅन त्यांच्या अंगावर पडला. अपघाताचा हा व्हिडीओ पाहणं हे खूपच भीतीदायक आहे. घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर मृत्यू जवळून पाहण्याची भीती स्पष्टपणे दिसून येतेय. हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा आहे, मात्र हा व्हिडीओ पुन्हा नव्याने व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हिएतनामचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की अचानक मोठा आवाज येतो आणि एक लहान मुलगा वर पाहताना दिसत आहे.

आणखी वाचा : कॅनडामध्ये आलेल्या SuperCell वादळाचा VIDEO VIRAL, थरारक दृश्य टाइमलॅप्स मोडमध्ये कॅप्चर

पंखी खाली पडणार आहे हे बाकीच्यांच्या लक्षात येत नाही आणि मग अचानक पंखा त्यांच्यावर पडतो. एक मोठा लोखंडी पंखा कुटुंबातील तीन सदस्यांवर पडला की, बाकीचे लोक खूप घाबरतात. मात्र, पंखा अशा प्रकारे पडतो की तिन्ही व्यक्ती त्याच्या पाकळ्यांमध्ये येतात आणि त्यांना थोडीशीही दुखापत होत नाही. अपघातामुळे घरातील सदस्य खूपच घाबरलेले पाहायला मिळतात. त्याचवेळी आई ओरडून धाकट्या मुलाकडे धावते आणि त्याला उचलून घेते. त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत आहे का ते तपासू लागते. पाहा धक्कादायक व्हिडीओ.

पंखा पडताच दुसरा मुलगा उठून दूर उभा राहिल्याचे तुम्ही पाहू शकता. यानंतर हे कसे घडले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. एवढा जड पंखा पडल्यानंतरही कुणाला साधी दुखापतही झाली नाही, हे कुटुंबीय नशीबवान होते. यानंतर वडील पडलेला पंखा उचलून बाजूला ठेवतात. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘जाको राखे सैयां मार सके ना कोई.’ असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांच्या क्रिएटीव्हीटीला उधाण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सलूनमध्ये न्हाव्याने लावलेलं सलमान खानचं गाणं ऐकून ग्राहक रडू लागला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख २२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ceiling fan falls down as family of 6 eats dinner in viral video see what happened prp

ताज्या बातम्या