scorecardresearch

कॅनडामध्ये आलेल्या SuperCell वादळाचा VIDEO VIRAL, थरारक दृश्य टाइमलॅप्स मोडमध्ये कॅप्चर

हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. वादळाचा विध्वंस व्हिडीओ थक्क करणारा आहे. या वादळाने कॅनडातले जनजीवन विस्कळीत झाले.

Supercell-Thunderstorm
(Photo: Twitter/ Jenny Hagan LostInSk )

Thunderstorm Viral Video: अलीकडच्या काळात निसर्गाच्या कहराचे अनेक उदाहरण पाहायला मिळतात. असाच निसर्गाच्या प्रकोपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल. घटनेचा हा व्हिडीओ कॅनडातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. वादळाचा विध्वंस व्हिडीओ थक्क करणारा आहे. या वादळाने कॅनडातले जनजीवन विस्कळीत झाले.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सुपरसेल वादळाचा कहर पहायला मिळतोय. कॅनडातील नैऋत्य सास्काचेवानमधील शेतजमिनीवर मोठ्या सुपरसेल वादळाचा पाऊस पाडणारा टाइमलॅप व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोमवारी वादळाचा पाठलाग करणाऱ्या जेनी हॅगनने हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही सुपरसेल वादळ पाहू शकता. सुपरसेल वादळ आकाशात फिरताना दिसत आहे. यावेळी जमिनीवर अंधार पसरला आहे. सुपरसेल वादळाचा हा व्हिडीओ खूपच थरारक आहे. तुम्ही वादळाच्या मागे सूर्याची किरणे देखील पाहू शकता. आकाशात दिसणारे हे दृश्य पाहताना कोणीही आपली नजर हटवू शकत नाही.

आणखी वाचा : डोक्यावर सुटकेस ठेवून या माणसाने चक्क सायकल चालवली, बॅलन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रूबाब! बदकाच्या कुटुंबाला रस्ता ओलांडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या; ऐटीत ओलांडला रस्ता, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ जेनी हॅगनने त्यांच्या LostInSk नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा विध्वंसक वादळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video shows spectacular supercell thunderstorm sweeping over canada town prp