सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जेथे तुम्ही व्हिडीओ पाहून स्वत:चं मनोरंजन करु शकता किंवा स्वत:चे व्हिडीओ देखील शेअर करु शकता. अनेकांना येथे प्रसिद्धी देखील मिळाली आहे. तर काही तरुण असे देखील आहेत, जे प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात, ज्यासाठी ते आपल्या जिवाची देखील पर्वा करत नाहीत.म्हणूनच तर बऱ्याचदा आपण सोशल मीडिया ओपन केला तरी देखील आपल्यासमोर असे अनेक स्टंटचे व्हिडीओ येतात. हे स्टंट खूपच धोकादायक असता, कारण यामुळे त्या स्टंट करणाऱ्या आणि इतर लोकांना देखील धोका असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो एका स्टंटचा आहे. ज्यामध्ये काही मुलं ट्रेनमधून बाहेर धारदार शस्त्रे फिरवताना दिसून आली.

या तरुणाचा हा स्टंट फारच धोकादायक आहे, कारण यामुळे धारदार शस्त्र चुकून त्यांच्यापैकी कुणाला किंवा आजुबाजूच्या व्यक्तींना लागून जीव धोक्यात येऊ शकतो. परंतू ते याचा विचारच करत नाही. खरं तर काही दिवसांपूर्वी चालत्या ट्रेनमध्ये दारात बसून प्लॅटफॉर्मवर तिघे जण धारदार शस्त्र कधी हवेत तर कधी प्लॅटफॉर्मवर फिरवताना दिसत आहेत. हे विद्यार्थी चालत्या ट्रेनच्या बाहेर लटकून आणि प्लॅटफॉर्मवर धारदार शस्त्रे घासून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नव्हे तर यातील एक जण रेल्वेच्या डब्यावर कुऱ्हाडीने वार करतानाही दिसला.

पण म्हणतात ना, तुम्ही काहीही केलंत तरी त्याची शिक्षा तुम्हाला याच जन्मात भोगावी लागते? तसंच या तरुणासोबत घडलं. त्यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या तिघांची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. गुम्मीदिपुंडी येथील अन्बरसू, पोनेरी येथील रविचंद्रन आणि अरुल अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व चेन्नईतील प्रेसिडेन्सी कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे डीआरएमने सांगितले.

आणखी वाचा : वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना भावूक झाला हा चिमुकला, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण हत्तीला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ तामिळनाडूमधला असल्याचं सांगण्यात येतंय. हे विद्यार्थी टोळीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना ऐकू येतात. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच असेच धोकादायक स्टंट न करण्याचं आवाहन देखील करत आहेत. दोषींना ट्रेनमध्ये आयुष्यभर प्रवासासाठी बंदी घातली पाहिजे अशाही काही कमेंट्स् यजूर्स देत आहेत.